तोंडात टाकताच विरघळणारी खवा-बेसन बर्फी, वाचा रेसिपी

खवा- बेसन बर्फीची रेसिपी जाणून घ्या.
Khawa Besan Barfi
Khawa Besan Barfiesakal
Updated on
Summary

यावर्षीही नेहमीप्रमाणे तुम्ही दिवाळीचे पदार्थ बनवणार असालच.

प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळीच्या फराळाची सुरुवात झाली असेलच? बरोबर ना. यावर्षीही नेहमीप्रमाणे तुम्ही दिवाळीचे पदार्थ बनवणार असालच. त्यात तेच तेच पदार्थ बनवून खायला नकोसे वाटतात. तर अशावेळी काही वेगळे पदार्थ तयार करुन नक्की पाहा. यावर्षी तुम्ही थोडी वेगळी रेसिपी ट्राय करू शकता. चला तर मग त्यातीलच खवा- बेसन बर्फीची रेसिपी जाणून घ्या.

Khawa Besan Barfi
Diwali Festival 2021: स्वादिष्ट बेसन लाडू, वाचा रेसिपी

साहित्य :

- खवा अर्धा किलो

- मोठा नारळ एक

- रवाळ बेसन एक वाटी

- बारीक रवा अर्धी वाटी

- साजूक तूप चार चमचे

- साखर एक किलो

कृती: सुरवातीला बेसन व रवा तुपामध्ये चांगले भाजून घ्या. त्यानंतर खवा गुलाबीसर भाजा. त्यातच ओल्या नारळाचा चवही परतून घ्या. नंतर साखरेच्या निम्मे

पाणी घालून पाक तयार करा. पाक तयार झाल्यावर त्यात भाजलेला रवा, बेसन, खवा आणि नारळ घालून खाली उतरवून २० ते २५ मिनिटे ढवळून घ्या. त्याचा गोळा होत आल्यावर ताटाला साजूक तुपाचा हात लावून थापा. ते कोमट झाल्यावर त्याचे वड्या तयार करुन घ्या.

Khawa Besan Barfi
Diwali Festival 2021 : घरच्या घरीच बनवा शाही बर्फी

टीप: जर तुम्हाला आवडत असल्यास बर्फीच्या वर चारोळी, बदामाचे आणि मिस्त्याचे काप ठेवू शकता.

(संदर्भ: पुस्तक-मराठी सण...मराठी रेसिपी, सकाळ प्रकाशन, लेखिका-अश्विनी अजित डिके)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.