Diwali Recipe : दिवाळीत नुसता चिवडा बेचव लागतो, विकतची कशाला घरी अशी बनवा कुरकुरीत शेव

Diwali Recipe : चिवडा नुसताच दिला तर चवीला लागत नाही. त्यावर भुरभुरलेली घरी बनवलेली शेव असेल तर त्याची चव अधिकच वाढते.
Diwali Recipe
Diwali Recipeesakal
Updated on

Diwali Recipe :

वर्षभर इतर सणांची लगबग आणि दिवाळी सणाचे तयारी काही वेगळीच असते. दिवाळीला फक्त घर सजवणे खरेदी करणे ह्या गोष्टी नसतात. तर घरातल्या गृहिणीने स्वतःच्या हाताने बनवलेला फराळ खाणे यात वेगळी मजा असते.

दिवाळीला जास्त नाही पण काही मोजके पदार्थ नक्कीच बनवावे लागतात. फराळातला मुख्य पदार्थ असतो चिवडा. चिवडा नुसताच दिला तर चवीला लागत नाही. त्यावर भुरभुरलेली घरी बनवलेली शेव असेल तर त्याची चव अधिकच वाढते. (Diwali Recipe)

Diwali Recipe
Navratri Fast Recipe: नवरात्रीत सकाळी आरोग्यदायी नाश्ता करायचा असेल तर बनवा स्वादिष्ट 'पनीर खीर', नोट करा रेसिपी

फराळाच्या पदार्थाची चव वाढवणारे ही बारीक शेव घरी कशी बनवायची. त्याची तयारी कशी करायची. कुरकुरीत होण्यासाठी काय ट्रिक वापरायची हे जाणून घेऊयात.

साहित्य :

१ वाटी तेल, ४ चहाचे चमचे तिखट, ४ चहाचे चमचे मीठ, पाव टी स्पून हळद, १ टी स्पून ओवापूड (ऐच्छिक), अंदाजे ४ वाट्या डाळीचे पीठ, तळण्याकरता तेल

कृती :

१ वाटी तेल १ वाटी पाणी घालून हाताने परातीत फेसावे किंवा एण बिटरने एकजीव करावे पाढरट रंगाचे होईपर्यंत फेसावे.

त्या तेलात १ चमचा ओवापूड, मीठ, तिखट, हळद घालावी व सामावेल तेवढे डाळीचे पीठ घालून भज्याच्या पिठापेक्षा घट्ट पीठ भिजवून घ्यावे.

Diwali Recipe
Shankarpali Recipe : गोड शंकरपाळीचा कंटाळा आला? या सात प्रकारे करा कुरकुरीत शंकरपाळ्या.!

पसरट कढईत तेल तापवावे वरील तयार पीठ सोऱ्यात मावेल एवढे भरावे सोऱ्याला आपल्या आवडीनुसार शेवेची बारीक अथवा मध्यम ताटली बसवावी व सोऱ्या कढईतल्या तेलावर धरून हाताने गोल फिरवत सोऱ्या दाबून कढईत शेवेचा गोल चवंगा पाडावा थोड्या वेळाने दुसऱ्या बाजूनी हलक्या हाताने उलगडून चवंगा दोन्ही बाजूने हलक्या गुलाबी रंगावर तळावा व चाळणीत तेलातून निथळून काढावा.

अशा रीतीने सर्व पिठाचे चवंगे घालून शेव तळून घ्यावी. अंदाजे ७ ते ८ चवंगे होतील व शेव वजनाला अर्ध्या किलोपेक्षा जास्त भरेल

Diwali Recipe
Navratri Fast Recipe: नवरात्रीत बनवा राजगिऱ्यापासून स्वादिष्ट पुरी, नोट करा रेसिपी

शेवेकरता डाळीचे पीठ बारीक दळलेले व ताजे वापरावे. ओवा सबंध घातला तर शेव घालताना ताटलीच्या भोकात ओवा अडकून शेव घालताना तुटते म्हणून ओवापूड घालावी. शेव कढईत घालताना गॅस प्रखर असावा नंतर मध्यम आच करून मंद तळावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.