Diwali Recipe : चकल्या नेहमीच बिघडतात तर अशी बनवा परफेक्ट चकली भाजणी, रेसिपी सेव्ह करून ठेवा

Diwali Chakali Recipe : चकलीच्या भाजणीत एखादा पदार्थ जास्त झाला तरी चकली बिघडू शकते.
Diwali Recipe
Diwali Recipe esakal
Updated on

Diwali Recipe :

दिवाळीच्या फराळातील सर्वात आवडता पदार्थ कोणता असेल तर तो चकली. हे उत्तर सर्वांचेच असते. दिवाळी संपली तरी लोक अनेक दिवस चहासोबत चकली खाऊन वेगळाच आनंद घेत असतात. खमंग खुसखुसीत अन् थोडी तिखट असलेली चकली पौष्टिकही असते.

कारण, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जिन्नस असतात. जे तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. पण, चकलीच्या भाजणीत एखादा पदार्थ जास्त झाला तरी चकली बिघडू शकते. त्यामुळेच, चकलीची भाजणी कशी बनवायची याची सोपी ट्रिक आपण पाहणार आहोत.

Diwali Recipe
Diwali Recipe 2023 : दिवाळीत करा मऊ आणि जाळीदार अनारसे, एकदम सोपी आहे रेसिपी

भाजणीचे साहित्य : (Chakali Bhajani Recipe)

 २ किलो जाडे तांदूळ, १ किलो हरभरा डाळ, अर्धा किलो उडीद डाळ, १०० ग्रॅम धने, ५० ग्रॅम जिरे.

Diwali Recipe
Diwali Recipe: दिवाळीत 'असे' बनवा तेलकट न होणारी खुसखुशीत खारी शंकरपाळे , पाहा व्हिडिओ

कृती :

 तांदूळ स्वच्छ निवडून धुवावेत व कपड्यावर वाळत घालावेत.

हरभरा डाळ व उडीद डाळ वेगवेगळी धुवून कपड्यावर वाळत घालावी.

सर्व जिन्नस एक दिवसभर चांगले वाळले की दुसऱ्या दिवशी कढईमध्ये मंद आचेवर हलक्या गुलाबी रंगावर भाजावेत.

धने भाजून त्यात मिसळावे व जिरे न भाजता तसेच मिसळावे.

भाजणी गिरणीतून बारीक दळून आणावी.

Diwali Recipe
Diwali Recipe :  दिवाळीच्या आठवडाभरातही मऊसूत राहतील असे नारळीपाकाचे लाडू नक्की ट्राय करा

भाजणी भाजताना कच्ची राहता कामा नये व डाळी करपता कामा नयेत. बेताचे मंद भाजावे म्हणजे भाजणी खमंग होते.

भाजणी बरेच दिवस टिकते. त्यामुळे एकावेळी जास्त करून घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवावी व जरुरीनुसार हवी तेवढी काढून चकल्या कराव्यात.

भाजणी दळताना एकदम बारीक दळून आणावी व मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यावी.

भाजणीकरता जाड तांदूळ वापरावेत म्हणजे भाजणी फुलते व चिकट होते. आंबेमोहोर किंवा तत्सम सुवासिक तांदूळ वापरायची आवश्यकता नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.