Diwali Recipe : दिवाळीत फराळावर ताव मारायचाय,पण डायटिंग? असा बनवा डायट फराळ!

चवदार कुरकूरीत आणि खुसखूशीत गोड फराळ पाहुण अनेकांची विकेट पडते
diwali faral news
diwali faral newsesakal
Updated on

पुणे : चवदार कुरकूरीत आणि खुसखूशीत गोड फराळ पाहुण अनेकांची विकेट पडते. फराळावर मनसोक्त ताव मारल्यावर मग लक्षात येतं की आपण डायटवर आहोत. मग तोंड वाकडं करून आरशासमोर जाऊन आपण फराळातून किती कॅलरी खाल्ल्या याचा हिशोब मांडत बसतो. त्यामुळे कुरकूरीत चिवडा, पेढ्यासारखे बेसन लाडू, नमकिन शेव डायटवर असलेल्या लोकांसाठी का नाही असा प्रश्न पडतो.

diwali faral news
Diwali Recipe : चकलीच्या साच्याचा शोध लागण्याआधीपासून बनवला जातोय हा पारंपरिक पदार्थ; जाणून घ्या रेसिपी

घरचे लोक, पाहुणे अनेकदा फराळ खाण्यासाठी विनंत्या करतात. पण, वजन कमी करण्यासाठी धडपडत असलेल्या लोकांना तो खाता येत नाही. त्यामुळेच आज डायट फराळ कसा बनवायचा हे पाहुयात. आता घरातल्या गृहीणी म्हणतील फराळाची पूर्व तयारी तर झाली आहे. वेळही कमी आहे मग आता कसा करायचा त्यांचा वेगळा फराळ. तर काळजी करू नका आम्ही जो डायट फराळ रेसिपी सांगणार आहोत त्या तुमच्या नेहमीच्या फराळातूनच करायच्या आहेत. त्या कशा बनवायच्या हे पाहुयात.

diwali faral news
Diwali Recipe : यंदाच्या दिवाळीला बनवा अनोखा करंजी वडा; जाणून घ्या रेसिपी

चटकदार डाएट चिवडा

फरळातील प्रमुख असलेला चिवडा डायटवर असलेले लोक चवीने खाऊ शकतात. त्यासाठी चिवड्याचे पातळ तेल न घालता पोहे आधी भाजून घ्या. तेलात शेंगदाणे, काजू, चण्याची डाळ, तीळ आणि मनुके भाजून घ्या. हे सर्व मिश्रण भाजलेल्या पोह्यात मिक्स करा. या मिश्रणात चवीपुरतं मीठ आणि पिटी साखर घालावी. थोड्याशा तेलात मिरची किंवा लाल तिखट, हळद आणि कडीपत्ता परतून घालावा. पोह्यांचं मिश्रण यात मिक्स करावं.हवे असल्यास तूम्ही या चिवड्यात ओट्सही घालू शकता. ओट्स डायटसाठी सुपर फुड मानले जाते. त्यामुळे याचा समानेश चिवड्यात केला तर वजनही वाढणर नाही आणि चिवडाही खाता येईल.

diwali faral news
Diwali Recipe: नाशिकचा खमंग चिवडा घरच्या घरी कसा तयार करायचा?

डायट शेव

शेव ही मुळात तळलेली असते त्यामुळे ती वजन वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे तळलेले पदार्थ डायट फुडमध्ये येत नाहीत. तर त्यासाठी बेसन, हळद, हिंग, लिंबाचा रस, पावडर साखर, तेल, चवीनुसार मीठ या संपूर्ण मिश्रणाला चांगलं मिक्स करुन आधी न वापरलेल्या कमी तेलात तळून घ्या.

diwali faral news
Diwali Recipe: दिवाळी स्पेशल पारंपरिक पद्धतीने खजुऱ्या कशा तयार करायच्या?

शंकरपाळी

शंकरपाळीचं पीठ मळताना त्यात थोडंसं तेल घालावं. आणि शंकरपाळी ओव्हनमध्ये बेक करावी. तसेच, चकलीच्या पीठात थोडं तेल घालावं. त्या पिठात थोडा कडीपत्ता घालावा त्यामुळे डायबेटिस असलेल्यांना चकलीचा त्रास होणार नाही. करंजी आणि चकलीही तूम्ही बेक करू शकता. बेक केलेल्या पदार्थामुळे तुमचे कोलेस्टेरॉलही वाढणार नाही.

diwali faral news
Breakfast Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा कुरकूरीत व्हेज कटलेट

लाडू बनवा पौष्टीक

गोड फराळात लाडूचा ऑप्शन आहे. पण हाच लाडू साखर, तूप यामुळे वजन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतो. त्यामुळे लाडूच्या गोडव्याला धक्का लागू न देता लाडू खजूर, बदाम, अक्रोड, कोकोपावडर पासून बनवाल तर तो जास्त पौष्टीक बनू शकतो.

diwali faral news
Recipe: वजन कंट्राेलमध्ये ठेवायंच? नाश्त्यात खा पौष्टीक अन् टेस्टी नाचणीचा उपमा

महत्त्वाची टीप

घरी तयार केलेल्या चकल्या, अनारसे, शेव तेलकट आहे म्हणून टाळू नका. कारण दिवाळी वर्षातून एकदाच येते. फक्त हे पदार्थ अनेक वेळा तळण केलेल्या तेलात तळू नका. तळणासाठी घरी बनवलेलं तूप असेल तर ते पुन्हा वापरता येतं. काही पदार्थ न तळता एअर फ्राइड आणि मायक्रोवेव्हमध्ये बेक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()