Diwali Recipe :  दिवाळीच्या आठवडाभरातही मऊसूत राहतील असे नारळीपाकाचे लाडू नक्की ट्राय करा

Rawa Ladoo Recipe : रव्याचे लाडू जर तुम्ही खोबरं घालून केले तर अतिशय सुंदर होतात
Diwali Recipe
Diwali Recipeesakal
Updated on

Diwali Recipe :

तुम्ही रव्याचे लाडू आजवर अनेकदा खाल्ले असतील. ते ताजे असताना मऊसूत असतात आणि काही दिवसानंतर ते फोडता येत नाही. कारण रवा आळून येतो आणि घट्ट बसतो. त्यामुळे दिवाळीच्या आठवडाभरानंतर हे लाडू खाण्यावर सारखे राहत नाहीत.

पण म्हणून रव्याचे लाडू करायचेच नाहीत का. किंवा केले तर ते पटकन संपवावेत का असे विचार करत असाल तर थांबा. सोपी ट्रिक सांगतो. रव्याचे लाडू जर तुम्ही खोबरं घालून केले तर अतिशय सुंदर होतात.

Diwali Recipe
Diwali 2024 Guide and Rules You Need to Know : दिवाळीत जुन्या लक्ष्मी-गणेश मूर्तीची पूजा करावी की नव्या मूर्ती आणाव्यात? वाचा सविस्तर

या लाडवांना नारळी पाकाचे लाडू असेही म्हणतात. हे लाडू खायला अगदी खमंग खुसखुशीत असतात आणि ते कितीही शिळे झाले तरी घट्ट दगडासारखे होत नाहीत. तर हे लाडू कसे बनवायचे हे पाहुयात.

Diwali Recipe
Diwali Dos and Don'ts: दिवाळीला कोणत्या गोष्टी कराव्या अन् कोणत्या नाही, वाचा एका क्लिकवर

साहित्य :

 २ वाट्या भरून रवा, दीड वाटी साखर, १ नारळ खोवून, १ वाटी वनस्पती तूप अथवा साजूक तूप (५) ५, ६ वेलदोड्यांची पूड, बेदाणे, बदाम काप (ऐच्छिक)

कृती:

पातेल्यात तूप घालून रवा मंद आचेवर गुलाबी रंगावर खमंग भाजावा. रवा भाजून होत आला की त्यात नारळाचा चव घालून थोडे भाजून खाली उतरवावे ख्यावर वेलदोडा पूड व बेदाणे घालावेत.

दीड वाटी साखरेत पाऊण वाटी पाणी घालून पाक करावा. एकतारी पाक करून गॅस बंद करून रवा व नारळाचे मिश्रण त्यात घालावे. मधून मधून ढवळत राहावे हळूहळू मिश्रण घट्ट होऊ लागेल ३-४ तासांनी मिश्रण लाडू वळण्याजोगे होईल हाताने मध्यम आकाराचे लाडू वळावेत. अंदाजे १८ ते २० लाडू होतील

Diwali Recipe
Diwali 2024 Food And Recipe: यंदा दिवाळीत जाळीदार अन् खुसखुशीत अनारसे बनवायचे आहेत? मग 'हा' व्हिडिओ नक्की पाहा

महत्त्वाची गोष्ट

ह्या लाडूमध्ये खवा घालतात खवा घालायचा असल्यास १०० ग्रॅम खवा वेगळा कढईत भाजून ख्याबरोबर मिसळून पाकात टाकावा

रवा खमंग भाजावा पांढरट भाजलेल्या ख्याचे लाडू दिसायला चांगले दिसले तरी खायला खमंग लागत नाहीत व टिकत पण नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.