वजन झटपट कमी करायचं? आहारात खेकड्याचा समावेश करा

आहारात खेकडे या चवदार पदार्थाचा समावेश केल्याने अनेक फायदे होतात.
Crab food
Crab foodसकाळ
Updated on

पावसाळा सुरू झाला की मांसाहारी लोकांच्या आहारात मटन, चिकन, मासे, अंडी, यासोबतच एक खास पदार्थ समाविष्ट होतो. तो म्हणजे खेकडे. मांसाहारी लोक आहारात खेकडा सूप, खेकडा करी, सलाड आणि स्टार्ट्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ समाविष्ट करतात. खेकडयातून खनिजं, ओमेगा थ्री फॅटी अ‍ॅसिड्स, व्हिटॅमिन यासोबतच उच्च प्रतीच्या प्रोटिन्सचा शरीराला पुरवठा होतो.

'चिखल्या' जातीचा खेकडा हा खाण्यासाठी खूप लोकप्रिय आहे. आहारात खेकडे या चवदार पदार्थाचा समावेश केल्याने होणारे पाच फायदे पुढील प्रमाणे आहेत.

Crab food
पावसाळ्यात चवदार खावसं वाटतं? ट्राय करा कणकेचा शिरा

1) मधुमेह असणाऱ्या लोकांनी खेकडे खाणे खूप फायदेशीर आहे. खेकडयांमध्ये उच्च प्रतीचं क्रोमियम असतं. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. खेकडयातील मांसल भागामध्ये काबरेहायड्रेट कमी असतं. त्यामुळे मधुमेहग्रस्त मांसाहारींसाठी खेकडा हा एक उत्तम पर्याय आहे.

2) तुम्ही जर का तुमच्या आहारात आठ-पंधरा दिवसातून एकदा खेकड्याचा समावेश केला तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होऊ शकतो. खेकडयांमधून ओमेगा थ्री फॅटी अ‍ॅसिडचा मुबलक पुरवठा होतो. यात कमीत कमी सॅच्युरेटेड फॅट्स असल्याने रक्तातील घातक कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी करण्यास मदत होते. यात आढळणा-या नायसिन आणि क्रोमियममुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते.

Crab food
Yogini Ekadashi 2022: एकादशी स्पेशल करा 'हा' Tasty फराळ, जाणून घ्या रेसिपी

3) खेकडे खाल्ल्याने रक्तदाबावर नियंत्रण राहते. खेकडयात असलेला पोटॅशिअम घटक शरीरात इलेक्ट्रोलेट्सचे संतुलन राखण्यास मदत करतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. कारण पोटॅशिअम हा घटक रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात प्रमुख भूमिका बजावतो.

4) खेकडे खाल्ल्याने रक्तपेशींच्या निर्मितीचं कार्य सुधारतं.रक्तपेशीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणा-या व्हिटॅमिन बी 12 चा खेकडयात मुबलक साठा असतो. यामुळे अ‍ॅनिमिया होण्याचा धोकादेखील कमी होण्यास मदत होते. ओमेगा थ्री या फॅटी अ‍ॅसिडमुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारण्यास मदत होते.

Crab food
Thyroid नियंत्रित करू इच्छिता? ट्राय करा 'हे' पाच सुपरफूड

5) खेकडे खाल्याने वजन कमी होतं. खेकडे खायला चविष्ट असले तरीही यात कॅलरी अधिक प्रमाणात नसल्याने तुम्ही बिनधास्तपणे खेकडयांचा आहारात समावेश करू शकता. यामुळे तुमचं वजन कमी होण्यास देखील मदत होऊ शकते. खेकड्यातून मोठ्या प्रमाणात प्रथिनं मिळतं म्हणून खेळाडू आणि बॉडीबिल्डर्सच्या आहारात खेकडे असतात.

6) खेकडे खाल्ल्याने सांधेदुखी कमी होते. खेकड्यात सेलेनियम या अ‍ॅन्टीऑक्सिडंटचा पुरवठा अधिक असतो. त्यामुळे हा मांसाहारींसाठी उत्तम पदार्थ आहे. शरीरात मिनरल्सच्या कमतरतेमुळे सांधेदुखीचा त्रास वाढतो. म्हणूनच आहारात खेकडयांचा समावेश करावा. याच्या सेवनाने ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होण्यास मदत होते, जे सांधेदुखी कमी करण्यास मदत करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.