आषाढ स्पेशल बाजरीच्या कापण्या कशा तयार करायच्या?

आषाढ स्पेशल कमी तेलकट खुसखुशीत पारंपरिक बाजरीच्या कापण्या सर्वत्र प्रसिद्ध आहे
बाजरीच्या कापण्या
बाजरीच्या कापण्याsakal
Updated on

आषाढ स्पेशल कमी तेलकट खुसखुशीत पारंपरिक बाजरीच्या कापण्या सर्वत्र प्रसिद्ध आहे. या बाजरीच्या कापण्या करण्यासाठी कोणकोणते साहित्य पाहिजे याशिवाय या कशा बनवाव्या, या विषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (famous Ashadhi Special Bajarichya Kapnya Maharashtrian Recipes)

बाजरीच्या कापण्या
MOMOS; मोमोज् खूप आवडत असतील तर ते पूर्णपणे चावून खा- AIIMS | Sakal Media |

बाजरीच्या कापण्या लागणारे साहित्य :

1) एक कप बाजरीच पीठ

2) अर्धा कप गव्हाचे पीठ

3) 100 ग्रॅम गुळ

4) अर्धा कप पाणी

5) एक चमचा बडीशोप पुड

6) अर्धा चमचा वेलचीपूड

7) दोन चमचे साजूक तुपाचे मोहन

8) अर्धा चमचा मीठ

9) एक चमचा खसखस

10) दोन चमचे तीळ

बाजरीच्या कापण्या
करिअर अपडेट : खाद्यसंस्कृतीची ओळख : कलिनरी टुरिझम

कृती :

  • प्रथम गॅसवर कढईत मध्ये पाणी गरम करून त्यात गूळ घातला व गुळ विरघळल्यावर गॅस बंद केला. गुळाचा पाक करायचा नाही तर त्याची गुळवणी तयार करुन ती गाळून घ्यावी.

  • एका भांडयात बाजरीचे पीठ, कणिक, बडीशोप सुंठीची पूड, वेलची पूड, थोडंसं मीठ सर्व मिक्स करून त्यात तुपाचे मोहन घालावे व चांगले एकजीव करून मिक्स करुन घ्यावे.

  • त्या मिश्रणात तीळ व खसखस मिक्स करून त्यात गुळवणी चे पाणी घालून पिठ चांगले मळून घ्यावे.

  • ते पिठ पंधरा वीस मिनिटे झाकून ठेवावे मग त्यातील थोडासा गोळा घेऊन त्याची पोळी लाटली. (पोळी पेक्षा थोडीशी जाडसर लाटावी) मग त्याचे वरूश तीळ लावावे नंतर त्यावर लाटणे फिरवावे. म्हणजे तीळ व्यवस्थित चिटकून राहतील.

बाजरीच्या कापण्या
घरकुल अपुले : पावसाळा आणि खादाडी
  • आता शंकरपाळ्याच्या चमच्याने शंकरपाळ्याच्या आकाराच्या कापण्या कापून घ्याव्या

  • आता कापण्या तयार झाल्या की कापण्या गॅसवर कढई मध्ये तेल गरम करून मध्यम आचेवर तळून घ्याव्या.

  • अशा रितीने बाजरीच्या गोड खुसखुशीत कापण्या तयार झाल्या आहेत.

(टिप - कापण्या जास्त पातळ घातल्यास कडक होतात व जाड लाटल्यास मऊ पडतात म्हणून त्या मध्यम लाटाव्यात.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.