आज आषाढी एकादशी आहे. उपवासासाठी फराळाचे पदार्थ करताना त्यात काही तरी गोडधोड पदार्थ असावा, असं गृहिणींना वाटतं. पण तुम्हाला उपवासाला चालेल असा पदार्थ सुचत नाही?तो पदार्थ सुचवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आषाढी एकादशी स्पेशलमध्ये फराळ रेसिपी सफरचंदाची रबडी कशी तयार करायची ते आपण पाहणार आहोत.
कृती :
सर्वप्रथम सफरचंद स्वच्छ धुवून घ्यावे. नंतर त्याची साल काढून घ्यावी आणि ते सफरचंद किसून घ्यावं. तोपर्यंत गॅसवर दूध आटवायला ठेवावं (साधारण एक लीटरचे अर्धा लीटर होऊ द्या)
दूध घट्ट झाल्यावर त्यात किसलेले सफरचंद आणि साखर मिक्स करावी आणि त्याला छान उकळी येऊ दयावी.
उकळी आल्यावर त्यात वेलायची पावडर आणि काजू बदामचे काप टिकावे आणि पुन्हा दुधाला मंद आचेवर दहा मिनिटे ठेवावे.
अशापध्दतीने तुमची सफरचंद रबडी तयार झाली आहे.
तुम्ही ही सफरचंद रबडी गरमगरम खाऊ शकता अथवा फ्रिजमध्ये ठेऊन नंतर खाऊ शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.