Ashadhi Ekadashi 2022: उपवासाला ट्राय करा टेस्टी आणि हेल्दी भेळ, जाणून घ्या रेसिपी

उपवासाची भेळ नेमकी कशी करायची?
Upwasa bhel
Upwasa bhelसकाळ
Updated on

आता आषाढी एकादशी काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे या आषाढी एकादशीच्या दिवशी फराळाला नेमकं काय करावं हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो. त्यामुळे आम्ही तुमच्याकरता आषाढी एकादशी स्पेशल फराळ रेसिपी सिरीज घेऊन आलो आहोत. या रेसिपी सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत उपवासाची भेळ नेमकी कशी करायची? (do you know how to make upwas bhel check here easy recipe)

Upwasa bhel
Ashadhi Ekadashi 2022: उपवासाचा ढोकळा कसा करायचा? जाणून घ्या सोपी रेसिपी

उपवासाची भेळ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य:

1) साबुदाण्याची तयार खिचडी (जर का वाटीभर साबुदाणा असेल तर ३/४ वाटी उकडलेल्या बटाटयाच्या फोडी या साबुदाणा खिचडीत टाकाव्यात आणि शेवटी थोडासा लिंबाचा रस टाकावा)

2) एक लहान वाटी नॉयलॉन साबुदाणा तळून घेतलेला

3) बारीक चिरलेली काकडी

4) एक वाटी खारे शेंगदाणे

5) एक वाटी तळलेला बटाटा कीस

6) साखर

7) एक मोठी वाटी दही

Upwasa bhel
Ashadhi Ekadashi 2022: एकादशीच्या दिवशी फराळाला करा खमंग साबुदाणा डोसा

कृती:

  • सर्वप्रथम आधी साबुदाण्याची खिचडी तयार करुन घ्यावी. नंतर नॉयलॉन साबुदाणा चांगला तळून घ्यावा.

  • नंतर एका डिशमध्ये साबुदाण्याची खिचडी टाकावी.

  • नंतर त्यावर २-४ चमचे खारे शेंगदाणे, थोडासा तळलेला साबुदाणा, त्यावर तितकाच बटाटयाचा कीस, त्यावर एक मोठा चमचा साखर घातलेलं दही टाकावं. त्यावर ३-४ चमचे बारीक चिरलेली काकडी, हे सर्व पदार्थ त्यावर वरुन टाकावे. खाणार्‍याने आपल्या आवडीप्रमाणे हे सर्व मिसळून घ्यावेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()