वसा आरोग्याचा : दिवाळीचा फराळ आणि आरोग्य

एकमेकांना रेडीमेड मिठाईचे, चॉकलेटचे, ड्रायफ्रूटचे बॉक्सेस दिले जातात.
diwali festival
diwali festivalEsakal
Updated on

डॉ. कोमल बोरसे

श्रावण, गणपती, नवरात्र, दसरा हे सण गेल्यानंतर आता येत आहे दिवाळी. दिवाळी म्हणजे डोळ्यांसमोर उभे राहतो तो फराळ चकली, चिवडा, करंजी, शंकरपाळे, अनरसे, तिखट शंकरपाळे, रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू, कडबोळी, चिरोटे, बालुशाही. हे सगळे पदार्थ आणि कदाचित अजून अधिक पदार्थ घरी बनवले जातात तसेच कंपन्यांमधून, पाहुण्यांकडून,

एकमेकांना रेडीमेड मिठाईचे, चॉकलेटचे, ड्रायफ्रूटचे बॉक्सेस दिले जातात. एवढी सगळी मिठाई बघितल्यानंतर आणि दिवाळी हा वर्षातून एकदाच येणारा तसेच आपल्यासाठी सगळ्यात मोठा सण. ही सगळी मिठाई खाणे नियंत्रित कसे होईल?

अशावेळी वर्षभर केलेला डायट इथे ब्रेक होतो. म्हणजेच वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींचे वजन पुन्हा वाढायला लागते. किंवा हेल्दी आहे त्यांचेही फॅट वाढायला लागते. कारण वरील सर्व पदार्थ तळलेले आहेत. दुसरे म्हणजे मैद्याचे आहेत. तुम्ही बाहेरून हे पदार्थ मागवत असाल तर त्यामध्ये विशिष्ट तसेच एकाच तेलाचा वापर वारंवार केला असल्याने त्यामध्ये ट्रान्स फॅट असतील. आता तुम्हाला प्रश्न पडेल की फराळ खायचा नाही तर दिवाळी कशी साजरी होईल?

अगदी बरोबर आहे. तुम्ही दिवाळीला फराळ खाऊ शकता फक्त काही गोष्टी लक्षात ठेवा, जेणेकरून तुमचे कमी झालेले वजन वाढणार नाही. तसेच ते पुढे कमी करायलाही त्रास होणार नाही. फराळ शक्यतो घरी बनवलेला खावा. तुम्ही कोणतीही तेलकट गोष्ट खाल्ली; मग ती घरी बनवलेली असेल किंवा बाहेरची, तुमचे वजन वाढणारच आहे.

परंतु त्यामध्ये तेलाचा किंवा तुपाचा प्रकार वापरला आहे. त्यामुळे तुमच्या हृदय तसेच लिपिड प्रोफाईलमध्ये बदल होऊ शकतात; म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल वाढू शकते. ते तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक असते. दुसरे म्हणजे घरी बनवायला फराळ हा स्वच्छ असतो, त्यामुळे आजारी पडण्याचा धोका कमी राहील. घरी फराळ तयार करण्याच्या काही टिप्स

१) चिवडा बनवताना त्याच्यामध्ये भरपूर भाजलेले पंढरपूर डाळे वापरावे. तेलाचा वापर कमी करावा. चव वाढवण्यासाठी लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता यांसारखे पदार्थ भरपूर वापरू शकता. शेंगदाणे, बदाम, काजू याचाही वापर करू शकता.

२) लाडू बनवताना शक्यतो ते प्रोटीन रिच म्हणजे बेसनाचे ड्रायफ्रूट्सचे बनवावे. याच्यामध्ये साखर गूळ घालण्याऐवजी काळे खजूर, काळे मनुके यांची प्युरी वापरावी. लोह युक्त लाडू तयार होतील. ते तुमचे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करतील.

३) तिखट किंवा गोड शंकरपाळे तळण्याऐवजी मायक्रोवेव्हमध्ये बेक करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.