भारतात डाळी, कडधान्य, भाज्या आणि फळांच्या स्वरूपात पोषण खजिना उपलब्ध आहे. याच खजिन्याची आपण या सदरात ओळख करून घेत आहोत. अनेक लोकांना हे घटक माहीत असले, तरी त्यांचे आरोग्यविषयक फायदे कळावेत हा या सदराचा हेतू. आज ओळख करून घेऊ या मोहरीची. विशेषतः तिच्या पानांची. ज्यांना मस्टार्ड ग्रीन्स किंवा सरसों असं म्हटलं जातं. मोहरीचं सगळं झाडच उपयुक्त असतं- त्याची पानं, बिया आणि मुळंही. आपण आज त्याच्या पानांवर भर देऊ
- मोहरीची पानं फक्त हिवाळ्यात उपलब्ध असतात आणि पंजाबमध्ये प्रसिद्ध असलेल्या ‘सरसों का साग’मध्ये त्यांचा वापर केला जातो.
- ही पानं अतिशय पोषक असलेल्या पालेभाज्यांपैकी एक आहेत.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
उपयुक्त घटक :
- मोहरीची पानं अनेक व्हिटॅमिन्स आणि खनिजं उपलब्ध करून देतात.
- ही पानं व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के यांनी युक्त असतात.
- ही पानं फोलेटही खूप चांगल्या प्रमाणात उपलब्ध करून देतात.
- मोहरीची पानं खाल्ल्यानं तुम्हाला व्हिटॅमिन ई, थायमिन, व्हिटॅमिन बी ६ आणि नियासिन हेही घटक मिळतात.
- या पानांमध्ये कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, कॉपर, झिंक, सेलेनियम, सोडियम ही खनिजद्रव्यंही असतात.
आरोग्यविषयक फायदे
- हृदयाचं आरोग्य सुधारतं.
- हाडं बळकट होतात.
- रोगप्रतिकारशक्ती वाढते.
- अँटी-ऑक्सिडंट्स मिळतात.
- या पानांमध्ये तंतूमय पदार्थही भरपूर असल्यानं तुमची पचन यंत्रणा चांगली राहण्यासाठी आणि उच्च कोलेस्टेरॉल पातळी कमी होण्यासाठीही त्यांचा उपयोग होतो.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
खाण्याची पद्धत
तुम्ही तीन प्रकारे ही पानं खाऊ शकता. कच्ची, उकडून किंवा लोणचं वगैरे करून.
- कच्ची पानं सॅलडमध्ये घातली, तर सॅलडला मसालेदार, तिखट चव येते.
- इतर पालेभाज्यांप्रमाणे ही पानं तुम्ही स्मूदी किंवा ज्युसेसमध्येही घालू शकता.
मोहरीची भाजी करून बघा
- कढईत तेल मंद आचेवर तापत ठेवा.
- त्यात लसूण घाला. ते सोनेरी करड्या रंगाचं आणि क्रिस्पी होईपर्यंत खूप वेळ हलवत परतून घ्या.
- पानं आणि किंचित पाणी थोड्याथोड्या प्रमाणात घालून ती हलवा.
- झाकण ठेवा. मधूनमधून हलवत राहा. दहा-बारा मिनिटं असं करा. त्यानंतर लिंबाचा रस आणि पाव चमचा तिखट घाला.
- वरून मीठ आणि तिखट भुरभुरा. गरज असल्यास अजून पाव चमचा तिखट घालून तुम्ही हे मिश्रण हलवू शकता.
ही भाजी अगदी सहजपणे करता येईल अशी आहे. ती बाजरीच्या भाकरीबरोबर खायला मस्त लागेल. तुम्ही नंतर ‘सरसोंका साग’सुद्धा करून बघू शकता
डॉ. मनीषा बंदिष्टी, ओबेसिटी आणि लाइफस्टाइल मॅनेजमेंट कन्सल्टंट
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.