चाऊमीन इन मनचाऊ नाहीतर पावसाळ्यातील आजारांपासून ही सूप्स तुम्हाला १०० टक्के दूर ठेवतील

अनेकजण आजारी लोकांना सूप पिण्याचा सल्ला देतात. त्यामुळं आज आपण पावसाळ्यातील आजारांपासून दूर राहण्यासाठी कोणत सूप प्यायला हव आणि ते कसं बनवायचं ते पाहू.
During the rainy season  drink ragi and seasoned pulse soup
During the rainy season drink ragi and seasoned pulse soup
Updated on

पाऊस हा कधी एकटा येत नसतो येताना सोबत अनेक आजारांना आणत असतो. त्यामुळे अनेकांना हवा हवासा वाटणार पाऊस आरोग्यासाठी हानिकारक ठरतो. पावसाळ्यात अनेक आजार उद्भवतात. यामध्ये सर्दी, डेंग्यु यांसारखे अनेक संसर्गजन्य रोग पसरतात. यावेळी अनेकजण आजारी लोकांना सूप पिण्याचा सल्ला देतात. त्यामुळं आज आपण पावसाळ्यातील आजारांपासून दूर राहण्यासाठी कोणत सूप प्यायला हव आणि ते कसं बनवायचं ते पाहू.

मोड आलेल्या कडधान्यांचे सूप

साहित्य :

१ वाटी मोड आलेले मूग किंवा मटकी

१ कप गोड ताक

अर्धा टी स्पून तेल, जिरे व कढीलिंब

चिमूटभर हिंग व चवीनुसार मीठ

कृती :

(१) मोडाचे कडधान्य घेऊन त्यात हिंग व मीठ घालावे ४ ते ५ कप पाणी घालून उकडावे. (२) उकडलेल्या कडधान्याला अर्धा टी स्पून तेलाची जिरे व कढीलिंबाची फोडणी घालावी व १ वाटी ताक घालून पुन्हा उकळावे.

(३) आवडीनुसार १ चमचा साखर घालावी. (४) कडधान्यासकट (कडधान्य गाळून न काढता) हे सूप सर्व्ह करावे.

मोड आलेल्या कडधान्याला ‘सुपरफूड’ असं म्हटलं जातं. कडधान्यात असलेल्या अनेक उपयुक्‍त घटकांमुळे शरीराला भरपूर फायदा होतो. त्यामुळे शरीर सुदृढ आणि आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर तुमच्या आहारात नियमित मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा.

नाजणीचे सूप

२ टे. स्पून नाचणीचे सत्त्व (साखर नसलेले) किंवा नाचणीचे पीठ

३ वाट्या ताजे गोड ताक

१ हिरवी मिरची बारीक चिरून

थोडी कोथिंबीर

चवीनुसार मीठ.

कृती :

(१) ताज्या ताकाला नाचणीचे सत्त्व किंवा पीठ लावावे. त्यात मिरची व मीठ घालून सतत ढवळत उकळावे. दाटसर झाले की कोथिंबीर घालून सर्व्ह करावे. (२) इच्छेनुसार अर्धा चमचा जिरे, हिंग घालून केलेली फोडणी घालावी.

नाचणीतील गुणधर्म लहान बाळांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. तांदूळ आणि गहू आणि ज्वारी पेक्षा किती तरी पटीने जास्त पोषकद्रव्ये नाचणीमध्ये असतात. शरीरासाठी आवश्यक असणारे प्रथिने, कार्बोदके, कॅल्शिअम आणि फॉस्फरस यांचे प्रमाणही भरपूर असते. ज्यामुळे आपली हाडे आणि दात एकदम मजबूत राहतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com