Easy Chana Masala Recipe : जर तुमच्या घरात भाजी नसेल आणि तुम्हाला काही चटपटीत आणि चमचमीत बनवायचे असेल तर तुम्ही छोले मसाला घरीच बनवू शकता. बनवायला खूप सोपे आहे. आणि 10 मिनिटात तयार होते. चना मसाला ही भारतातील आवडत्या पाककृतींपैकी एक आहे. रोटी, नान इत्यादी सोबतही खाऊ शकता.
साहित्य :-
छोले - 100 ग्रॅम
तेल - ३ चमचे
जिरे - १/२ टीस्पून
कढीपत्ता - 5-6
कांदा - १
हिरवी मिरची - ३
आले लसूण पेस्ट - 1/2 टीस्पून
मिरची पावडर - 1 टीस्पून
धनिया पाउडर - 1/2 टीस्पून
मीठ - चवीनुसार
गरम मसाला - 1 टीस्पून
नारळ पावडर - 1 टीस्पून
लिंबाचा रस - 2 चमचे
कोथिंबीर
खडे मसाले
कसुरी मेथी
कृती :-
छोले शिजवून घ्या - एक कप छोले सात ते आठ तासांसाठी पाण्यात भिजत ठेवा. यानंतर प्रेशर कुकरमध्ये भिजलेले छोले, अर्धा कप चहाचा काढा, तेजपत्ता, मोठा वेलदोडा, दालचिनीचा तुकडा, वेलची, लवंग आणि थोडं पाणी एकत्र घ्या. सर्व मिश्रण सहा ते सात शिट्ट्या येईपर्यंत शिजवा.
तेलात कांद्याची पेस्ट फ्राय करा- पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेलामध्ये कांद्याची पेस्ट घाला आणि तीन ते चार मिनिटांसाठी परतून घ्या. यानंतर लसूण- आल्याची पेस्ट मिक्स करा आणि सामग्री दोन मिनिटांसाठी शिजवा.
टोमॅटो पेस्टसह हळद-तिखट मिक्स करा - आता टोमॅटोची पेस्ट पॅनमध्ये मिक्स करा. थोड्या वेळानंतर हिंग, हळद, लाल तिखट, धणे पूड, डाळिंबाच्या दाण्यांची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण ३-४ मिनिटे शिजवा.
पॅनमध्ये पाणी ओता- थोडंसं पाणी ओतून सर्व मिश्रण नीट मिक्स करून घ्या.
छोल्यांमधील गरम मसाला बाहेर काढा - छोले शिजल्यानंतर प्रेशर कुकरमधील गरम मसाला बाहेर काढावा. यानंतर कुकरमध्ये पॅनमधील मसाला मिक्स करावा. सर्व मिश्रण नीट एकजीव करून घ्या.
कसूर मेथी पावडर - आता चवीनुसार मीठ आणि कसुरी मेथी पावडर घालून सर्व सामग्री दोन शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्या.
तुपाची फोडणी- आता दुसऱ्या भांड्यामध्ये फोडणीसाठी तूप गरम करत ठेवा. लसूण- हिरव्या मिरच्या तेलात मिक्स करा. सर्वात शेवटी भाजलेले जिरे घाला व सर्व सामग्री फ्राय करून घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.