कोल्हापूर : कोणताही कार्यक्रम असो किंवा सण-समारंभ असो वाढदिवस कार्यक्रम यामध्ये रोटी किंवा चपातीनंतर भारतीय भोजनमध्ये (indian dish) पुरीला पसंती दिली जाते. आपण नाष्टा, दुपारचे जेवण किंवा रात्रीच्या जेवणामध्ये (lunch and dinner) सर्रास पुरी (puri) खातो. परंतु जर पुरी फुललेली असेल तर लोक खाण्याला अधिक पसंती देतात आणि त्यासाठी त्याचं पीठ उत्तम मळूण घेणे गरजेचं असतं. पुरीचे पीठ मळून घेणे थोडे कठीण असते. परंतु योग्य विधीनुसार याला मळून घेतले तर उत्तम आणि स्वादिष्ट होते. आज आम्ही तुम्हाला पुरीचे पीठ कसे मिळावे या संदर्भात काही विशेष टिप्स (special tips) देणार आहोत. (easy steps for poori atta prepare how make for women)
तुम्ही ज्या प्रकारे चपाती किंवा रोटीचे पीठ मळता त्याचप्रमाणे पुरीचा पीठ मळायचे असते. परंतु रोटीच्या पिठात जितका मुलायमपणा असतो त्यापेक्षा अधिक मुलायमपणा हा पुरीच्या पिठामध्ये असावा लागतो.
पुरीचे पीठ मळण्यासाठी दोन कप गव्हाचे पीठ घ्यावे. यामध्ये एक छोटा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालावे. यामुळे तुमची पुरी नमकीन होईलच शिवाय ते मिळण्यासाठी मदत होईल आणि यामध्ये साखर घातल्याने त्याचा रंग पांढरा होईल.
आता तुम्हाला यामध्ये अर्धा कप दूध आणि पाणी घालायचे आहे. यामध्ये दूध आणि पाणी हळूहळू मिक्स करा त्यामुळे पीठ लगेच मळून होईल.
जर तुम्ही नमकीन पुरी बनवणार असाल तर त्यामध्ये मीठ थोडे जास्त घाला. त्यामुळे पुरीला नमकीन स्वाद येईल.
जर तुम्ही पुरीला चीज स्टफिंग करणारा असाल तर तुम्हाला हा आटा थोडा मुलायम होईपर्यंत मळावा लागेल.
या गोष्टी ठेवा लक्षात
जेव्हा पुरीचा पीठ पूर्णपणे मळून होईल त्यावर एक छोटा चमचा तेल लावा. याशिवाय तुम्ही तुपाचाही वापर करू शकता. यामुळे पुरी कुरकुरीत होईल.
आता मळलेल्या पिठाला एका प्लेटमध्ये घेऊन कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवा. परंतु हे करताना एक लक्षात घ्या, ते कापड ओलसर असलं पाहिजे.
पंधरा ते वीस मिनिटे त्या पिठाला सेट होऊ द्या. यानंतर तीस सेकंदाने ते पुन्हा एकदा मळा यामुळे तुमची पुरी खुसखुशीत होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.