Rice Curd Benefits : दहीभात खाणे गुणकारी ठरतेय; अनेक आजारावर जालीम उपाय!

मानवी शरीराला आवश्यक असणारे ट्रिप्टोफॅन नावाचे एक रसायन दह्यामध्ये असते
Rice Curd Benefits
Rice Curd Benefits Esakal
Updated on

जगातील सर्वात जुने शास्त्र म्हणून ओळखले जाणाऱ्या आयुर्वेदात माणसाच्या जेवणाची अचूक पद्धत सांगितली आहे. यानुसारच पूर्वीच्या काळी जेवणाची सांगता दहीभात खाऊन केली जायची. यामागील कारणाचा कधी विचार केला आहे का? आजही जूने जाणते लोक जेवणात दहिभात खाण्याचा आग्रह धरतात. याचे कारण आहे त्याचे गुणधर्म. होय, दहिभात खाणे तूमच्या आरोग्याच्या अनेक समस्यांवर गुणकारी ठरणार आहे. यामागे, खरेतर फार मोठे आयुर्वेदिक शास्त्रीय कारण आहे. त्याबद्दलच आज जाणून घेऊयात.

हे ही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

सध्याच्या लोकांना काही गोष्टी स्विकारणे कठीण जाते. त्यामूळे त्या पुराव्यासह सांगितल्या तरच पटतात. अनेकदा लोक दही आणि ताक खाल्ल्याने झोप येते असे सांगून ते खाणे टाळतात. पण,त्याचे अनेक फायदे आहेत ते जाणून घेऊ.

दही शरीराराला देते ट्रिप्टोफॅन

मानवी शरीराला आवश्यक असणारे ट्रिप्टोफॅन नावाचे एक रसायन दह्यामध्ये असते. हे रसायन मानवी शरीरात तयार होत नाही. शरीरातील इतर घटकांसोबत त्याचे मिश्रण झाल्यावर सेरटोनिन आणि मेलाटोनिन ही रसायने तयार होतात. त्यातील सेरटोनिन मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी अतिशय उत्तम आहे. त्याने आपला मूड चांगला होणे, झोप चांगली लागणे, स्मरणशक्ती वाढणे यांसारखे फायदे होतात.

Rice Curd Benefits
Eating Egg : हेल्दी राहण्यासाठी दिवसातून किती अंडी खावीत?

दही भातासोबतच का खावे?

भातामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. म्हणून दहीभात खाल्ल्याने मेंदूत सेरटोनिन जास्त प्रमाणत तयार होते. असे केल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यात तुम्ही मदत करतात.

वजन कमी होते

भात खाल्ल्याने वजन वाढते अशा भ्रमात असलेल्या लोकांसाठी ही गोष्ट मान्य करणे कठीण आहे. पण, होय दही भात नियमित खाल्याने वजन कमी होते. दह्यातील गुणधर्म तूमच्या कॅरलीज कमी करण्यात मदत करतात.

Rice Curd Benefits
Gynecomastia : जगातील एकतृतीयांश पुरुष स्तनांच्या अप्रमाणित वाढेने त्रस्त; जाणून घ्या याची कारणे

पोटावर गुणकारी

पोट बिघडल्यावर साधा आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यामूळे इतर काही पदार्थ खाण्यावर बंधन येतात. पण दही भात खाल्ल्याने पोट शांत राहते. अन्न पचायला मदत होते. तसेच, जुलाबही कमी होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()