जर तुम्हाला संध्याकाळच्या स्नॅकमध्ये नेहमीचे तेच ते पदार्थ बनवण्याचा कंटाळा आला असेल, तर तुमची चव सुधारण्यासाठी क्रिस्पी एग लॉलीपॉप ट्राय करा. हे टेस्टी इंडो चायनीज स्नॅक्स रेसिपी संध्याकाळचा नाश्ता किंवा डिनर पार्टी मध्ये स्टार्टर म्हणून देण्यासाठी परफेक्ट आहे.
तुम्हाला माहिती का,पृथ्वीवरील सर्वात पौष्टिक पदार्थांमध्ये अंड्यांची गणना केली जाते. एका अंड्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. चला तर मग वाट कसली पाहताय, जाणून घेऊया कसे तयार करायचे टेस्टी क्रिस्पी एग लॉलीपॉप.
साहित्य:
1) 8 ते 10 उकडलेले अंडी
2) दोन कप मैदा
3) दोन चमचे कॉर्नफ्लोर
4) एक लाल मिरची पावडर
5) एक चमचा हळद
6) एक चमचा काळी मिरी पावडर
7) एक चमचा आले-लसूण पेस्ट
8) एक बारीक चिरलेला कांदा
9) एक बारीक चिरलेली सिमला मिरची
10) दोन चमचे चिली सॉस
11) एक चमचा सोया सॉस
12) अर्धा हिरवी मिरची
13) कोथिंबीर
14) पाणी
कृती:
क्रिस्पी एग लॉलीपॉप बनवण्यासाठी प्रथम एक मोठा मिक्सिंग बाऊल घ्या आणि त्यात मैदा, कॉर्नफ्लोअर, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घाला. नंतर त्यात आले लसूण पेस्ट टाका आणि पाणी घालून चांगले मिक्स करा. आता उकडलेले अंडे पिठात बुडवून काही वेळ बाजूला ठेवा.
तळण्यासाठी कढईत तेल गरम करा. त्यात कोट केलेले अंडी घाला आणि 10 ते 12 मिनिटे तळून घ्या आणि टिश्यू पेपरवर काढा.आता दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात चिरलेले आले, लसूण घालून एक मिनिट परतून घ्या. यानंतर कांदा आणि सिमला मिरची घालून काही मिनिटे परतून घ्यावे. आता वर नमूद केलेले सर्व सॉस घाला आणि चांगले मिक्स करा. तुमचे गरमागरम क्रिस्पी एग लॉलीपॉप तयार आहेत. कोथिंबीर टाकून गरमा गरम सर्व्ह करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.