Eid Ul Adha 2024 : बकरी ईद बनवा अधिक स्पेशल, घरच्या घरी करा ‘या’ पदार्थांचा बेत

Eid Ul Adha 2024 : आज देशभरात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.
Eid Ul Adha 2024
Eid Ul Adha 2024 esakal
Updated on

Eid Ul Adha 2024 : आज देशभरात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. बकरी ईद हा मुस्लिम समाजाचा महत्वाचा सण आहे. बकरी ईदला ईद-उल-अजहा असे ही म्हटले जाते. या दिवशी बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. त्यामुळे, हा दिवस बकरी ईद म्हणून ओळखला जातो.

या दिवशी मुस्लिम नागरिक सर्वात आधी नमाज अदा करतात आणि त्यानंतर बकऱ्याची कुर्बानी देतात. त्यानंतर, लोक बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी मित्र आणि नातेवाईकांच्या घरी जातात. अशा परिस्थितीमध्ये पाहुण्यांच्या स्वागतासाठी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. आज बकरी ईदनिमित्त पाहुण्यांसाठी घरच्या घरी बनवण्यासाठी कोणते स्पेशल पदार्थ तुम्ही बनवू शकता? त्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Eid Ul Adha 2024
Eid Ul Adha 2024 : बकरी ईद निमित्त अनारकली ड्रेस परिधान करणार आहात? मग, अभिनेत्रींच्या 'या' बेस्ट लूक्सपासून घ्या प्रेरणा

व्हेज कबाब

बकरी ईदनिमित्त जर तुम्ही काही शाकाहारी पदार्थ बनवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही व्हेज कबाब नक्कीच बनवू शकता. घरी आलेल्या पाहुण्यांना नॉनव्हेज पदार्थ खायला देण्यापूर्वी तुम्ही नाश्त्यामध्ये व्हेज कबाब खायला देऊ शकता. विशेष म्हणजे व्हेज कबाब हा रूमाली रोटीसोबतही स्वादिष्ट लागतो त्यामुळे, मेनकोर्समध्ये ही तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. व्हेज कबाबसोबत कांदा आणि हिरवी चटणी अवश्य सर्व्ह करा.

शेवया

बकरी ईदच्या दिवशा हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे शेवया होय.  डेझर्टमध्ये हा पदार्थ नक्की बनवा. शेवयांपासून स्वादिष्ट खीर, शीर खुर्मा असे गोड पदार्थ तुम्ही नक्कीच बनवू शकता. शेवयांमुळे ईद पूर्ण होते, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. घरी आलेल्या पाहुण्यांसाठी शेवया अवश्य बनवा.

सीख कबाब

ईदच्या दिवशी घरी आलेल्या पाहुण्यांसाठी स्नॅक म्हणून तुम्ही सीख कबाब नक्कीच बनवू शकता. विशेष म्हणजे हा पदार्थ तुम्ही चिकन आणि मटण दोन्हींपासून बनवू शकता. रूमाली रोटी, हिरवी चटणी आणि कांद्यासोबत हा सीख कबाब अवश्य सर्व्ह करा. हा पदार्थ खाल्ल्यावर पाहुणे तुमचे तोंडभरून कौतुक करतील यात काही शंका नाही.

फ्रूट कस्टर्ड

हा गोड पदार्थ सर्वांना खायला आवडतो. घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट होणारा गोड पदार्थ म्हणजे फ्रूट कस्टर्ड होय. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण हे फ्रूट कस्टर्ड मोठ्या आवडीने खातात. फार कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारा हा पदार्थ चवीला उत्तम लागतो.

Eid Ul Adha 2024
Types Of Biryani: बकरी ईदनिमित्त बनवा 'या' 5 प्रकारच्या बिर्याणी, ईदचा आनंद होईल द्विगुणित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.