Farali Misal Recipe : आज शुक्रवार उपवास आहे, आज खूप लोकं उपवास धरतात, काहींची तर कायमची एकादशी असते आणि त्यात एकादशी म्हटली की दोन वेळचा उपवास, त्यात फराळाला काय करावं असा प्रश्न असेलच.
नेहमीची साबुदाण्याची खिचडी, भगर विसरा, बनवा खास उपवासाला चालेल अशी मिसळ. या साठी आपल्याला शेंगदाण्याची उसळ, बटाट्याची भाजी, साबुदाण्याची खिचडी हे पदार्थ लागतील. ही आहे रेसिपी.
शेंगदाण्याच्या उसळीसाठी
साहित्य:
३/४ कप शेंगदाणे
१ टिस्पून तूप
१/२ टिस्पून जिरे
४ टेस्पून दाण्याचा कूट
१/२ कप पाणी
२ आमसुलं
२-३ हिरव्या मिरच्या
१ टिस्पून गूळ
चवीपुरते मिठ
बटाट्याची भाजी
२ कप शिजलेल्या बटाट्याच्या फोडी
१ टिस्पून साजूक तूप
१/२ टिस्पून जिरे
३-४ हिरव्या मिरच्या
२ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
१ टिस्पून लिंबाचा रस
१/२ ते १ टिस्पून साखर
चवीपुरते मिठ
साबुदाण्याची खिचडी
३/४ कप साबुदाणा
२ टिस्पून तूप
१/२ टिस्पून जिरे
३-४ हिरव्या मिरच्या
२ टेस्पून ओला नारळ
दिड ते २ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
चवीपुरती साखर आणि मिठ
१ टिस्पून लिंबाचा रस
इतर साहित्य:
बटाटा सळी
चिरलेली कोथिंबीर
मिरचीचा ठेचा (मिरची + मिठ + थोडीशी जिरेपूड)
दही
कृती:
१) सर्वप्रथम शेंगदाणे ७-८ तास पाण्यात भिजत घालावेत. मिठ घालून कूकरमध्ये शिजवावेत.
२) साबुदाणे ४-५ तास भिजवावेत. उरलेले पाणी काढून टाकावे व साबुदाणे झाकून ठेवावे.
३) बटाट्याची भाजी आणि शेंगदाण्याची उसळ आधी करून ठेवली तरी चालते, पण साबुदाणा खिचडी आयत्यावेळी करावी कारण साबुदाण्याची खिचडी थंड झाली कि तिची चव उतरते
४) मिसळ करताना सर्व पदार्थ गरम करावेत.
प्लेट किंवा बोलमध्ये आधी १ चमचा बटाट्याची भाजी, खिचडी आणि मग दाण्याची उसळ अशा क्रमाने वाढावे. लिंबू पिळावे. त्यावर बटाट्याचा चिवडा टाका. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे. तुम्ही सोबत दही किंवा मठ्ठा सुद्धा घेऊ शकतात. जर तिखटपणा हवा असेल तर मिरचीचा ठेचा टाका.
टीप:
१) जर बटाटा सळी नसेल किंवा त्याऐवजी दुसरे काही वापरायचे असेल तर घरगुती बटाट्याचा चिवडा वापरावा. तसेच बटाटा चिवडा विकतही आणू शकतो.
२) या मिसळीत बरेच वेरिएशन्स करता येतात. जसे बटाट्याच्या भाजीसारखीच सुरण-भोपळ्याची भाजी करता येते. तसेच खमंग काकडीही बनवून मिसळीत घालू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.