Hritik Roshan Diet: तब्बल 14 महिन्यांनी हृतिकने मोडला डायट? काय होतं स्पेशल कारण अन् जाणून घ्या चिट मिलची सोपी रेसिपी

‘इश्क जैसा कुछ’ या गाण्याचे शूटिंग संपल्यानंतरचा एक बीटीएस व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता हृतिक रोशन त्याच्या आवडत्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना दिसत आहे.
Hritik Roshan Diet: तब्बल 14 महिन्यांनी हृतिकने मोडला डायट?  काय होतं स्पेशल कारण अन् जाणून घ्या चिट मिलची सोपी रेसिपी
Updated on

Hritik Roshan Diet : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या त्याच्या आगामी ‘फायटर’ सिनेमामध्ये व्यस्त आहे. या सिनेमात हृतिकसोबत अभिनेत्री दीपिका पदूकोण प्रमुख भूमिकेत झळकणार असून पहिल्यांदाच या दोघांची जोडी पडद्यावर पहायला मिळणार आहे.

या सिनेमातील ‘इश्क जैसा कुछ’ या गाण्याचे शूटिंग संपल्यानंतरचा एक बीटीएस व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या बीटीएस व्हिडिओमध्ये अभिनेता हृतिक रोशन त्याच्या आवडत्या खाद्यपदार्थांचा आनंद घेताना दिसत आहे.

फायटर सिनेमाच्या टीमने हा बीटीएस व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हृतिक त्याच्या डायटला सुट्टी देऊन त्याच्या आवडीचे गोड पदार्थ खाताना दिसत आहे. तब्बल १४ महिन्यांनंतर हृतिकने त्याच्या या आवडत्या पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला आहे.

फायटर सिनेमाच्या शूटिंगसाठी आणि या चित्रपटातील त्याच्या लूकसाठी हृतिकने बरीच मेहनत घेतली आहे. या सिनेमासाठी हृतिकने तब्बल १४ महिने त्याच्या आवडत्या गोड पदार्थांना हात लावला नव्हता. मात्र, जेव्हा या सिनेमाचे आणि या 'इश्क जैसा कुछ' गाण्याचे शूटिंग संपले तेव्हा मात्र, हृतिकने त्याचा डायट मोडला आणि आवडत्या गोड पदार्थांचा आस्वाद घेतला.

हृतिकने चाखलेल्या गोड पदार्थांमध्ये बीटाचा हलवा पहायला मिळतोय. हृतिकला आवडणारा बीटाचा हलवा कसा बनवायचा? त्याची रेसिपी आज आपण जाणून घेऊयात.

Hritik Roshan Diet: तब्बल 14 महिन्यांनी हृतिकने मोडला डायट?  काय होतं स्पेशल कारण अन् जाणून घ्या चिट मिलची सोपी रेसिपी
Hrithik Roshan Fitness : हृतिकसारखी बॉडी हवीय तर त्याच्यासारखे डायट अन् वर्कआउटही करायला हवं, जाणून घ्या त्याचे फिटनेस सिक्रेट

बीटाचा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे

  • ३-४ बीट (किसून घेतलेले)

  • १ लीटर दूध

  • साखर (अंदाजानुसार)

  • विलायची पावडर १ छोटा चमचा

  • ड्रायफ्रूट्स मूठभर

  • तूप

  • १ वाटी खवलेला नारळ

बीटाचा हलवा बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • सर्वात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये तूप घालून त्यात खवलेला नारळ भाजून घ्या.

  • नारळ सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर एका भांड्यात थंड व्हायला काढून ठेवा.

  • आता पुन्हा एकदा गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यात तूप घालून त्यात किसलेले बीट परतून घ्या. त्यानंतर, त्यात दूध, विलायची पावडर आणि भाजलेला नारळ मिक्स करा.

  • १५-२० मिनिटे हे मिश्रण शिजायला ठेवा. त्यानंतर, मिश्रण शिजल्यानंतर त्यात तुमच्या अंदाजानुसार मीठ आणि साखर घाला.

  • पुन्हा हे मिश्रण थोडे घट्ट व्हायला ठेवा. हे मिश्रण चांगल्या प्रकारे घट्ट झाल्यानंतर एका बाऊलमध्ये बीटाचा हलवा काढून घ्या.

  • आता यावर ड्रायफ्रूट्स घालून बीटाचा हलवा खायला घ्या.

Hritik Roshan Diet: तब्बल 14 महिन्यांनी हृतिकने मोडला डायट?  काय होतं स्पेशल कारण अन् जाणून घ्या चिट मिलची सोपी रेसिपी
Beetroot Pickle : बिटाचं लोणचं वाढवेल जेवणाची चव, पाहा ही सोपी रेसिपी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.