Crispy French Fries Recipe: घरी बनवलेले फ्रेंच फ्राईज कुरकुरीत होत नाहीत, 'या' घ्या टीप्स

घरी बनवल्यानंतर फ्रेंच फ्राईजला काही मिनिटातच मऊ पडतात. त्याचा कुरकुरीतपणा थोडा कमी होतो.
Crispy French Fries Recipe
Crispy French Fries Recipe
Updated on

फ्रेंच फ्राईज म्हटलं की, लहान मोठ्यांपासून सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. फ्रेंच फ्राईज हा असा एक स्नॅक आहे जो सर्व वयोगटातील लोकांना आवडतो. त्यामुळे अनेकजण बाहेरुन विकत आणण्याऐवजी घरीच बनवायचा प्रयत्न करतात. पण घरी बनवल्यानंतर फ्रेंच फ्राईजला काही मिनिटातच मऊ पडतात. त्याचा कुरकुरीतपणा थोडा कमी होतो. शिवाय ते तळल्यानंतर त्यात अनेकदा तेल तसेच राहते. अशा परिस्थितीत तुम्ही शेफ पंकज भदोरिया यांनी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा अन् घरीच बनवा क्रिस्पी फ्रेंच फ्राईज.

तर क्रिस्पी फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे?

  • रेस्टॉरंटसारखे फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी बटाटे व्यवस्थित कापून घेणे आवश्यक आहे. अशावेळी कापताना बटाटे १/४ इंच जाडीत कापून घ्या. हा फ्राईजसाठी योग्य आकार आहे.

  • कापलेले बटाटे थंड पाण्यात थोडे व्हिनेगर आणि मीठ घालून ७-८ मिनिटे उकळा. नंतर फ्राईज बाहेर काढून किचन टॉवेलवर ठेवा. असं केल्याने फ्राईजला उत्तम पोत मिळते.

Crispy French Fries Recipe
Makhana Cutlet Recipe : नाश्त्यासाठी बनवा टेस्टी आणि हेल्दी 'मखाना कटलेट', वाचा ही सोपी रेसिपी
  • फ्राईज पूर्णपणे थंड झाल्यावर ते हवाबंद डब्यात ठेवा आणि फ्रीज करा. जेणेकरून ते व्यवस्थित सेट होऊन कडक आकार घेतील. जसे पॅक केलेले फ्राईज असतात.

  • रेस्टॉरंटसारखे कुरकुरीत फ्राईज बनवण्यासाठी प्रथम फ्राईज गरम तेलात फक्त ५० सेकंद ठेवा. आणि मग त्यांना पेपर टॉवेलवर काढा. थंड होऊ द्या.

  • फ्राईज सुपर क्रिस्पी बनवण्यासाठी डीफ्रॉस्ट करणे टाळा. असे केल्याने त्यांचा आकार खराब होईल. जेव्हा तुम्हाला ते बनवायचे असतील तेव्हा त्यांना फ्रीजरमधून बाहेर काढा आणि गरम तेलात सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा.

Crispy French Fries Recipe
Peri Peri Masala Recipe: घरीच बनवा पेरी-पेरी मसाला अन् वाढवा फ्रेंच फ्राईज, स्प्रिंग रोलची चव

फ्रेंच फ्राईजचा रंजक इतिहास

फ्रेंच फ्राईजला फ्रेंच म्हणतात, म्हणूनच लोक मानतात की फ्रेंच फ्राईस प्रथम फ्रान्समध्ये बनवले गेले. पण फ्रान्सचा शेजारी देश बेल्जियमचे म्हणणे आहे की, फ्रेंच फ्राईज पहिल्यांदा बेल्जियममध्ये बनवले आणि खाल्ले गेले.

एका अहवालानुसार, फ्रेंच फ्राईज बेल्जियममध्ये 1680 च्या हिवाळ्यात लोकांच्या भेटीला आला. ही कथा तिथल्या नामूर नदीशी संबंधित आहे. नामूर नदीजवळ राहणारे रहिवासी या नदीतून मासे पकडायचे आणि ते तळून खात, पण एकदा एवढी थंडी पडली की संपूर्ण नदी गोठली. अशा स्थितीत मासे नसल्यामुळे तिथल्या लोकांनी बटाट्याचे लांबट तुकडे करून त्याला माशासारखे तळायला सुरुवात केली. ज्याला आपण आज फ्रेश किंवा फेंच फ्राईज म्हणतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.