sabudana khichdi
sabudana khichdi

Perfect Sabudana Khichadi: परफेक्ट साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी वापरा 'ही' ट्रिक

साबुदाणा खिचडी बनवताना काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
Published on

साबुदाणा खिचडी ही अनेकांच्या घरी क्वचितच केली जाते. बहुतांश वेळा खिचडी उपवासाच्याच निमत्ताने घरी बनते. अनेकज खिचडी खायला मिळते म्हणून उपास करतात. त्यामध्ये तुम्ही देखील असालच.

पण कधी कधी खिचडी बनवताना अनेक चुका होतात अन् खिचडी चिकट होते. खिचडी करताना जर साबुदाण्यांचा लगदा झाला तर अख्खी खिचडी खराब होते. त्याची चव देखील बिघडते.

sabudana khichdi
Paneer Koliwada Recipe: चमचमीत कुरकुरीत खायचायं? घरीच बनवा 10 मिनिटात पनीर कोळीवाडा

दाताला चिकड लागल्याने खिचडी खाण्याची मज्जाच निघून जाते. तर आज आम्ही तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहोत जी तुम्ही फॉलो केलात तर तुमची परफेक्ट साबुदाणा खिचडी बनेल.

साबुदाणा भिजवताना घ्या काळजी

खिचडी चांगली होण्यासाठी मध्यम आकाराच्या साबुदाण्याची निवड करा. भिजवून ठेवण्यापूर्वी २-३ वेळा स्वच्छ धुवा म्हणजे साबुदाण्यातील स्टार्चही निघून जाईल. भिजवण्यासाठी साबुदाणा असेल तेवढेच पाणी घाला. जर ते जास्त पाणी शोषले तर ते चिकट होईल.

sabudana khichdi
Upvasachi Kadhi Recipe: उपवासाला साबूदाण्यासारखा जड पदार्थ खाण्यापेक्षा हलकी कढी पिणे कधीही चांगलेच, लगेच जाणून घ्या रेसिपी

साबुदाणा कमी पाण्यात चांगला फुगतो आणि ओला राहत नाही, हे लक्षात ठेवा की तुम्हाला साबुदाण्याचे पाणी 3-4 तासांच्या आत गाळून बाजूला ठेवावे लागेल.

चिकटपणा घालवण्यासाठी लिंबू वापरा

लिंबाच्या रसामुळे खिचडी मोकळी आणि मऊसर होते. ही खिचडी बराच वेळ अशी राहते. विशेष म्हणजे ती पुन्हा गरम केली तरीही चिकट न होता आहे तशीच मोकळी राहते. म्हणूनच लिंबू वरुन पिळून घेण्यापेक्षा खिचडी करताना पिळल्यास खिचडी अधिक चांगली व्हायला मदत होते.

sabudana khichdi
Rava Uttapam Recipe: नाश्त्यासाठी झटपट बनवा रवा उत्तापा, जाणून घ्या रेसिपी

तसेच, अनेकजण भिजलेल्या साबुदाण्यामध्ये कूट, साखर, मीठ घालतात आणि मग हे सगळे फोडणीत घालतात. पण असं करु नका. कारण यामुळेच खिचडी जास्त चिकट होण्याची शक्यता असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com