Food: रोज रोज डब्याला काय करायचं? मेथीचे हे पाच प्रकार ट्राय करा

सर्वांसाठी झटपट आणि मस्त टिफीन बनवण्यासाठी या काही मेथीच्या रेसिपीज
Food
Foodgoogle
Updated on

मुंबई : रोज रोज डब्याला हेल्दी आणि टेस्टी काय द्यावं हा प्रश्न तर कायम असतो; हे एक प्रकारचं टेन्शन असतच. सर्वांसाठी झटपट आणि मस्त टिफीन बनवण्यासाठी या काही मेथीच्या रेसिपीज;

मेथी ही अष्टपैलू पालेभाज्यांपैकी एक आहे. ती विविध प्रकारच्या रेसिपीज बनवण्यासाठी वापरली जाते. पालकानंतर, सर्वात अष्टपैलू असलेली मेथी आहे जी राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर पिकविली जाते आणि संपूर्ण हिवाळ्यात खाल्ली जाते.

5 जलद आणि सोप्या मेथीच्या रेसिपीज तुम्ही जरूर करून पहा :

1. अंडा मेथी भुर्जी - साधी अंडा भुर्जी नेहमीच क्लासिक टेस्ट देते पण तरी मेथीबरोबर तिची लज्जत आणखीन थोडी का वाढवू नये?

साहित्य

मेथी, कांदे, चिरलेला, टोमॅटो, चिरलेला, हिरव्या मिरच्या, लसूण (किसलेले), आले (किसलेले), जिरे, एक चिमूटभर हिंग, धणे, हळद, गरम मसाला पावडर, चवीनुसार मीठ, चवीनुसार लाल मिरची पावडर, सजावटीसाठी कोथिंबीर, अंडी

कृती:

- कढईत तूप/तेल गरम करा. जिरे रंग बदलेपर्यंत परतून घ्या.

- कांदा, हिरवी मिरची आणि लसूण परतून घ्या.

- टोमॅटो आणि लसूण मीठ, तिखट, धने आणि हळद घालून परतून घ्या

- मेथीची पाने टाकून ते मऊ होईपर्यंत शिजवा. मिश्रणावर अंडी फोडून ते शिजेपर्यंत फेटा.

- गरम मसाला पावडर घाला, मिक्स करा आणि कोथिंबीर वरून सजवा.

2. मेथी अजवाईन पराठा - हा मेथी पराठा केवळ स्वादिष्टच नाही तर तयार करायलाही अत्यंत सोपा आहे. या रेसिपीमध्ये दही आणि केळी सारखे काही घटक देखील आहेत, जे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असतात.

साहित्य :

गव्हाचे पीठ, मीठ, लाल मिरची पावडर, टीस्पून धणे पावडर, कॅरम सीड्स (अजवाईन), किसलेली हिरवी मिरची, कसुरी मेथी, तूप/तेल

कृती

- एक वाटी घ्या आणि त्यात गव्हाचे पीठ टाका.

- एक एक करून सर्व साहित्य वाडग्यात मिसळा. तूप घालून सोबत सर्व साहित्य मिसळा. १५-२० मिनिटे बाजूला ठेवा.

- पीठाचे छोटे/मध्यम आकाराचे गोळे करा.

- पीठाचा गोळा घ्या आणि चपातीप्रमाणे लाटून घ्या.

- तवा गरम करून ठेवा. त्यावर मेथी पराठा मध्यम आचेवर शिजवा.

- दोन्ही बाजूंनी पराठा शिजवा आणि प्रत्येक बाजूला चांगले तूप लावा.

- उरलेल्या पिठाच्या गोळ्याचेही पराठे बनवून घ्या.

- तुम्ही गरमागरम परांठे लोणच्या सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करू शकता.

3. मेथी छोले - जर तुम्हाला छोले आवडत असतील तर तुम्ही हे मेथी छोले नक्की वापरून पहा! ही रेसिपी मेथी टाकून वाढवली जाते आणि सोबत भटुरे दिल्यास उत्तम.

साहित्य

छोले, मेथीची पाने, तूप, जिरे, तमालपत्र, कांदे, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, हळद, तिखट, जिरे पावडर, गरम मसाला, धणे पावडर, टोमॅटो

कृती :

- भिजवलेले छोले 7-8 शिट्ट्या करून शिजवा आणि चाळणीतून चाळून बाजूला ठेवा.

- कढईत तूप गरम करा. जिरे, तमालपत्र, आले, लसूण, हिरवी मिरची आणि कांदा परतून घ्या. मीठ, हळद आणि टोमॅटो घाला. टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवा.

- मेथीची पाने घाला. तिखट, जिरे पावडर, गरम मसाला आणि धणे पावडर घालून मसाले परतावा

- तेल सुटलं की उकडलेले छोले घाला. सर्व मसाला एकत्र येईपर्यंत हे परतावा. मेथी छोले तयार आहे.

4. मेथी थेपला - थेपला एक पारंपारिक गुजराती डिश आहे ज्याने त्याचे आकर्षण दिवसेंदिवस वाढतेच आहे. हा गव्हाचे पीठ, बेसन, बाजरी आणि मसाल्यांनी बनविला जातो.

साहित्य:

गव्हाचे पीठ, बेसन, मेथीची पाने, तेल, हिरव्या मिरच्या, हळद, कोथिंबीर, साखर, लाल मिरची पूड, दही, मीठ

कृती :

- थेपल्यांचे पीठ मळण्यासाठी एका परातीत किंवा मोठ्या भांड्यात दही, साखर , मीठ , हळद , लाल मिरची पूड , हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घालून नीट मिसळून घ्यावे. साखर पूर्ण विरघळली गेली पाहिजे . आता चिरलेली मेथीची पाने घालून नीट एकत्र करून घ्यावे.

- आता गव्हाचे पीठ, बेसन आणि तेल घालून नीट एकत्र मळून घ्यावे. हिरव्या पालेभाज्यांत भरपूर पाणी असते , म्हणून पीठ मळताना जास्त वरचे पाणी घालू नये . नाहीतर मळलेली कणिक ओलसर होते आणि थेपले लाटायला कठीण होतात . जास्तीतजास्त पाव कप पाणी वापरून कणिक घट्ट मळावी . कणिक 10 मिनिटे झाकून ठेवावी.

- 10 मिनिटांनंतर कणकेचे आपल्याला हवे त्या आकाराचे गोळे बनवून घ्यावेत. गव्हाच्या पीठावर ठेपले गोल आणि पातळ लाटून घ्यावेत.

- मोठ्या आचेवर तवा चांगला तापवून घ्यावा . नंतर आच माध्यम ठेवून त्यावर ठेपले दोन्ही बाजूंनी खरपूस तेल लावून भाजून घ्यावेत. एक ठेपला भाजून घ्यायला जास्तीतजास्त 2 मिनिटे लागतात !

हे थेपले लोणच्याबरोबर किंवा लिंबाच्या लोणच्यासोबत, दह्यासोबत, चटणीसोबत किंवा नुसतेच खायला ही फार छान लागतात.

5. गाजर - मेथी भाजी - गजर आणि मेथी हिवाळ्यातील सर्वात लोकप्रिय भारतीय पदार्थांपैकी एक आहे. ही फक्त जलद आणि सोपी नाही तर स्वादिष्ट देखील आहे.

साहित्य

गाजर, मेथी, कांदा, जिरे, हिंग, तिखट, धने पावडर, हळद, आमचूर पावडर, मीठ, तेल

कृती

- गाजर मेथीची भाजी बनवण्यासाठी आधी गाजर धुवून सोलून घ्या. आता त्याचे छोटे काप करा.

- मेथी काढा आणि त्याची पाने धुवा. मेथी चिरून घ्यावी.

- आता कढईत तेल गरम करा. जिरे घालून शिजवा. त्यात हिंग घाला आणि मिक्स करा.

- हिंग झाल्यावर त्यात चिरलेला कांदा घालून मऊ होईपर्यंत शिजवा. त्यात धनेपूड, लाल तिखट, हळद, मीठ घालून मिक्स करा.

- एकजीव झाल्यावर त्यात चिरलेली गाजर घालून मिक्स करून मध्यम आचेवर 5 मिनिटे शिजू द्या. थोडे पाणी घालून गाजर शिजेपर्यंत शिजवा.

- गाजर शिजल्यानंतर त्यात मेथी टाका. मेथी शिजेपर्यंत परतावा. पाणी सुकल्यावर त्यात आमचूर आणि 1 चमचा तेल घाला. सर्वकाही मिसळा आणि आणखी 2 मिनिटे मंद आचेवर शिजवा. 2 मिनिटांनी गॅस बंद करून सर्व्ह करा.

- गाजर मेथीची भाजी सोबत गुजराथी कढी, तडका रायता आणि फुलक्यांना सर्व्ह करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()