जर तुम्हाला पनीर आवडत असेल तर तुमच्या नाश्त्यासाठी पनीर सँडविच हा एक चांगला पर्याय असू शकतो. पनीर सँडविच हा खूप चांगला नाश्ता आहे. तुम्ही सकाळ आणि संध्याकाळच्या नाश्त्यासाठीही बनवू शकता.
पनीर सँडविचची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते अगदी सहज घरी बनवता येते. ते बनवण्यासाठी फक्त 15 ते 20 मिनिटे लागतात. या सँडविचचा तुम्ही चहा, कॉफी किंवा तुमच्या आवडत्या चटणीसोबतही आस्वाद घेऊ शकता. खास करून तुमच्या मुलांना पनीर सँडविच नक्कीच आवडेल. चला तर मग जाणून घेऊया पनीर सँडविची रेसिपी.
ब्रेड - 8 स्लाईस
पनीर - 100 ग्रॅम
लोणी - 2 चमचे
हिरवी मिरची- 2
कांदा - 1 (बारीक चिरलेला)
कोथिंबीर - 2 चमचे
मेयोनीज - 3 चमचे
टोमॅटो - 2
टोमॅटो सॉस - 2 चमचे
मीठ - चवीनुसार
सर्व प्रथम एका भांड्यात पनीर, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ आणि मेयोनीज चांगले मिसळा आणि बाजूला ठेवा. यानंतर ब्रेडच्या दोन्ही बाजूंना बटर नीट लावा. बटर लावल्यानंतर तयार मिश्रणाचा थोडासा भाग ब्रेडवर ठेवा आणि ते चांगले पसरवा. आता त्यावर कांदा आणि टोमॅटोचे तुकडे ठेवा आणि नंतर त्यावर इतर बटर लावलेले ब्रेड ठेवा. आता हे नॉन-स्टिक पॅन किंवा टोस्टरमध्ये चांगले बेक करा. काही वेळाने तुमच्या आवडत्या सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.