Kokani Pohe Recipe: साध्या पोह्यांना द्या कोकणचा तडका अन् बनवा हटके डिश; वाचा रेसिपी

नेहमी नेहमी तेच तेच पोहे खाऊन कंटाळाही येतो. आज आपण पोह्यांची हटके रेसिपी जाणून घेऊया
Kokani Pohe Recipe
Kokani Pohe Recipeesakal
Updated on

Kokani Poha Recipe: भारतात कुठेही जा पोहे सगळीकडेच आवडीचा नाश्ता प्रकार आहे. मुळात पचवायला हलके, चवीला सुंदर आणि बनवायला अगदीच थोडा वेळ पोहे घेत असल्याने पोहे सगळ्यांना आवडतात. मात्र नेहमी नेहमी तेच तेच पोहे खाऊन कंटाळाही येतो. आज आपण पोह्यांची हटके रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य:

250 ग्रॅम पोहे

1 कप नारळाचे दूध

1 टीस्पून गूळ

½ टीस्पून चिंचेची पेस्ट

2 हिरव्या मिरच्या

½ टीस्पून धणे

½ बडीशेप

चिमूटभर हिंग

12-15 कढीपत्ता

1 लाल मिरची

1 टीस्पून मोहरी

आवश्यकतेनुसार तेल

चवीनुसार मीठ

Kokani Pohe Recipe
Gold Plated Food Dish : अबब! रेस्टॉरंटमध्ये चक्क 1.3 कोटींच बिल; जेवणाऱ्यांनी लावला डोक्याला हात

कृती:

1. धणे आणि बडीशेप बारीक कुटून ह्या. गूळ आणि चिंच भिजत घालून कोळ तयार करून घ्या.

2. नारळाच्या दुधात चिंचेचा कोळ, धणे आणि बडीशेप पावडर हिरवी मिरची आणि मीठ घालुन छान मिक्स करा.

3. कढईत तेल टाकून त्यात मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि लाल मिरच्या टाकून फोडणी तयार करा.

4. नंतर त्यात नारळाच्या दुधाच तयार मिश्रण घाला आणि चांगले मिक्स करून घ्या.

5. एका बाजूला पोह्यांना एका चाळणीत घेऊन भिजवून घ्या.

6. आता त्यांना कढईत टाका आणि छान मिक्स करा, म्हणजे दूध पोह्यांमध्ये मुरेल.

7. चवीनुसार मीठ घाला आणि वाफ भरली की कोथिंबीर आणि ओल्या नारळाच्या किसासोबत सर्व्ह करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()