Kids Habits: मुलांना जंक फूडपासून दूर ठेवायचंय? मग ट्राय करा या टिप्स

जंक फूडचा अर्थातच आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होत असतो. अशात मुलांच्या या हट्टाला कसं समोर जावं. जंक फूडपासून त्यांना कसं दूर करावं असा प्रश्न अनेक पालकांना पडतो. यासाठीच आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत
मुलांना ठेवा जंक फूड पासून दूर
मुलांना ठेवा जंक फूड पासून दूरEsakal
Updated on

लहान मुलांना कमी वयातच काही चांगल्या सवयी लावणं गरजेचं असतं. लहान वयात मुलांचे हट्ट पुरवणं हे योग्य असलं तरी काही काळानंतर काही ट्रिक्स वापरून त्यांचे वाईट हट्ट पुरवणं बंद करावं लागतं. सध्याच्या काळामध्ये धावपळ, कामाचा व्याप या सगळ्या गोष्टींमध्ये आहाराचा दर्जा Diet Quality घसरत चालला आहे. Food Tips Keep Away Your Children from Junk Food

अनेकजण आठवड्यातील बरेच दिवस घरात जेवण किंवा नाश्त्याएवजी हॉटेलमधील नाश्ता खाणं पसंत करतात. तसंच घरात लहान मुलं असतील तरी रेडी टू इट, मॅगी, ब्रेड किंवा इतर इन्स्टंट पदार्थांवर Instant Food भर देतात.

सध्याच्या काळामध्ये अनेक मुलांना जंकफूडची Junk Food सवय लागल्याचं दिसतं. या सवयी मोडणं अनेकदा पालकांसाठी कठिण होतं. मुलं जंक फूडसाठी हट्ट धरू लागतात. काही मुलं तर जंक फूड मिळालं नाही तरी घरातील जेवण Meal किंवा अन्न खाण्यास नकार देतात. अशा वेळी पालकांचा मोठा गोंधळ उडतो.

जंक फूडचा अर्थातच आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होत असतो. अशात मुलांच्या या हट्टाला कसं समोर जावं. जंक फूडपासून त्यांना कसं दूर करावं असा प्रश्न अनेक पालकांना पडतो. यासाठीच आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही मुलांच्या जंक फूडच्या सवयी कमी करून त्यांना हेल्दी खाण्याकडे वळवू शकता.

मुलांना भरपेट आणि आवडीचा नाश्ता द्या

सकाळचा नाश्ता हा दिवसभरातील आहारातील एक महत्वाचा भाग आहे. जर मुलांना सकाळी भरपेट नाश्ता दिला तर त्यांना दिवसभर सतत काही ना काही खाण्याची इच्छा कमी होईल. यासाठी त्यांना सकाळी पोटभर नाश्ता करण्यास प्रोत्साहीत करा. तुम्ही देखील त्यांच्यासोबत नाश्त्यास बसा.

दररोज एकाच प्रकारचा नाश्ता केल्याने मुलं कंटाळू शकतात आणि जंक फूडचा आग्रह धरु शकतात. यासाठीच त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ घरी बनवून नाश्त्यामध्ये द्या.

हे देखिल वाचा-

मुलांना ठेवा जंक फूड पासून दूर
Bhel Puri : भेळ हे Junk Food नव्हे; बिनधास्त खा अन् वजन कमी करा

मुलांना फास्ट फूडचे तोटे सांगा

नाश्ता असो किंवा जेवण मुलांसोबत एकत्र जेवायला बसण्याचा प्रयत्न करा. यावेळी त्यांना जंक फूडमुळे होणारं नुकसान पटवून द्या. यासाठी तुम्ही त्यांना काही उदाहरणं देऊ शकता. तसचं त्यांना ताटीतील घरगुती पदार्थ, भाज्या, फळं यातील पोषक तत्व आणि त्यातील फायद्याचं महत्व सांगा.

मुलांचा हट्ट पुरवण्यासाठी हेल्दी पर्याय निवडा

जर तुमचं मुल पिझ्झा, बर्गर किंवा मॅगी तसचं चिप्स अशा पदार्थांचा हट्ट धरत असेल तर तुम्ही त्याला होममेड हेल्दी पदार्थ बनवून देऊ शकता. तुम्ही घरीच भरपूर भाज्या टाकलेला चपातीचा पिझ्झा किंवा शेवयांचा उपमा, व्हेजिटेबल टिक्की, रोस्टेड मखाना किंवा कुरमुऱ्याची भेळ असे पदार्थ देऊ शकता. ज्यामुळे त्याला जंक फूडचा विसर पडेल.

तसंच जर तुम्ही घराबाहेर असलात तरी तुम्ही हेल्दी पर्याय निवडू शकता. जसं की फ्रूटी किंवा इतर कोल्ड्रिंकचा हट्ट केल्यास उसाचा रस किंवा ताज्या फळांचा रस द्या. आईस्क्रिमचा हट्ट केल्यास लस्सी किंवा मिल्कशेक देऊ शकता.

चॉकलेट आणि केकला पर्याय

लहान मुलांना खास करून गोड पदार्थ खाण्याची जास्त आवड असते. अनेक लहान मुलं आईस्क्रिम, चॉकलेट किंवा पेस्ट्री असे पदार्थ खाण्याचे हट्ट करतात. यासाठी तुम्ही घरात काही हेल्दी स्नॅक्सचे पदार्थ तयार करून ठेवू शकता किंवा त्यांना फळं खाण्यास देऊ शकता.

मुलं फळं खाण्यास नकार देत असतील तर त्यांना फ्रूट सॅलड तयार करून सुंदर डेकोरेट करून दिल्यास ते आवडीने खातील. तसंच ड्राय फ्रूट लाडू, शेंगदाणा चिक्की, गूळ चणे, मनुका, खजूर असे पदार्थ त्यांना तुम्ही देऊ शकता.

लहानपणापासूनच सवयी लावणं

मुलं जेव्हा विविध पदार्थ खाण्यास सुरुवात करतात तेव्हा पासूनच त्यांना खाण्याच्या चांगल्या सवयी लावणं गरजेचं आहे. कारण या सवयी आयुष्यभरासाठी असतात. त्यांना विविध भाज्या, फळं आणि वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खाण्यास द्या आणि ते खाण्यासाठी प्रोत्साहित करा.

याशिवाय मुलांना जास्तीतजास्त वेळ विविध अॅक्टिव्हिटीजमध्ये व्यग्र ठेवा. कारण अनेकदा मुलं रिकामी असली की जंक फूड खाण्यासाठी हट्ट करतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांनी जंक फूडसाठी हट्ट करू नये यासाठी सर्वप्रथम पालकांना चांगल्या सवयी असणं गरजेचं आहे.

हे देखिल वाचा-

मुलांना ठेवा जंक फूड पासून दूर
Nutrition Rich Foods: मुलांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतं योग्य पोषण; ‘हे’ खाद्यपदार्थ करतील मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.