Food Tips : टेस्टही अन् चवीला बेस्टही, जाणून घ्या रेसिपी

घरात भाजी नाही आणि आता झटपट काय बनवायचे, असा प्रश्न असेल तर आजची रेसिपी तुमच्यासाठी आहे.
Food Tips
Food Tipsesakal
Updated on

Recipe : घरातली भाजी संपली असेल आणि काही झटपट, चटपटीत आणि तिखट खाण्याची इच्छा असेल तर ही टेस्टी आणि चवीला बेस्ट रेसिपी तुम्ही ट्राय करू शकतात. छोले (चना) मसाला घरी बनवणे खूप सोपे असते. भारतीयांची ही फेवरेट रेसिपी आहे असे म्हटले तरी हरकत नाही. हे तुम्ही चपाटी, रोटी, नान किंवा अगदी नुसतेसुध्दा खाऊ शकतात.

ही रेसिपी ग्रेव्हीची किंवा सुकी करू शकतात. आम्ही येथे सुका छोले मसाल्याची रेसिपी सांगत आहोत. जाणून घेऊ रेसिपी.

Food Tips
Banana Cake Recipe: बिना मैदा आणि बिना अंड्याशिवाय केक कसा तयार करायचा?

साहित्य

  • छोले - १०० ग्रॅम

  • तेल - २ चमचे

  • जीरे - अर्धा चमचा

  • कढी पत्ता - ५-६

  • हिरवी मिरची - ३

  • कांदा - १

  • आले लसूण पेस्ट - अर्धा चमचा

Food Tips
Recipe : साऊथ इंडियन सांबर बनवण्याची सोपी रेसिपी
  • लाल तिखट - १ चमचा

  • धणे पूड - अर्धा चमचा

  • मीठ

  • गरम मसाला - १ चमचा

  • नारळाचा चव - १ चमचा

  • लिंबाचा रस - २ चमचे

  • कोथिंबीर

Food Tips
Recipe : बनवा बेसनाचे टेस्टी अप्पे

कृती

  • गॅसवर कढई ठेऊन तेल गरम करावे.

  • नंतर जीरे, कढीपत्ता, कांदा, आले लसूण पेस्ट, हिरवी मिरची घालून फोडणी करावी.

  • नंतर त्यात लाल तिखट, धणे पूड आणि चवी पूरते मीठ घालावे.

  • नंतर त्यात भिजवलेले छोले घालून परतावे.

Food Tips
Food Recipe : घरच्या घरी बनवा रेस्टॉरंटसारखा White Sauce Pasta
  • आता त्यात थोडे पाणी घालावे.

  • नंतर त्यात नाराळाचा चव आणि गरम मसाला घालून झाकण ठेऊन ५ मिनीट शिजवावे.

  • नंतर त्यात लिंबाचा रस घालावा.

  • वरून नाराळाच्या चव आणि कोथिंबीर घालून गार्निशिंग करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.