स्कीनसहित की स्कीनलेस यापैकी कोणते चिकन खाण्यासाठी योग्य जाणून घ्या....
काही लोक मांसाहारात केवळ चिकन खायला आवडते. चिकन पौष्टीक असते.त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात प्रोटिन्स असतात. चिकन वजन कमी करण्यास मदत करू शकते, त्यामुळेच जिम करणाऱ्या लोकांचे चिकन फेवरेट आहे. बऱ्याच मांसाहारी लोकांना चिकन खाण्याबद्दल शंका असते. स्कीनसहित की स्कीनलेस यापैकी कोणते चिकन खाण्यासाठी योग्य जाणून घ्या....
चिकनच्या मांसाच्या विक्रीत लॅटिन अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2019 मध्ये येथे दरडोई चिकनची विक्री 32.70 किलो होती. 2020 मध्ये ब्राझीलने प्रति व्यक्ती 40.6 किलो चिकन फस्त केले. दुसरीकडे, अर्जेंटिनामधील प्रत्येक व्यक्तीने 47 किलो चिकन खाऊन या यादित पहिले स्थान पटकावले होते.
इंडियन कौन्सिल ऑफ अॅग्रिकल्चर अँड फूड(Indian Council of Agricultural Research) च्या २०१५ च्या सर्वेनुसार भारतात ३.१ किलो दरडोई चिकन खाल्ले जात होते. इतर देशांच्या तुलनेत हा आकडा १७ किलोने कमी होता.
चिकनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात आणि ते व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचाही महत्त्वाचा स्रोत मानला जातो. चिकनमध्ये मोनो सॅच्युरेटेड फॅट (monounsaturated fat) असते, जे लोकांच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते. चिकनच्या स्कीनमध्ये भरपूर चरबी असते. त्यामुळे चिकन स्कीनसोबत खावं की स्किनशिवाय असा प्रश्न अनेकदा पडतो.
चिकनच्या स्कीनमध्ये 32 टक्के फॅट असते. म्हणजेच 100 ग्रॅम चिकन स्कीनसह खाल्लं तर 32 ग्रॅम चरबी तुमच्या शरीरात जाईल. चिकनच्या त्वचेत असलेल्या चरबीपैकी दोन तृतीयांश चरबी असुरक्षित असते. याला "गुड फॅट्स" असे म्हणतात. या चरबीमुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी सुधारते. चरबीचा एक तृतीयांश भाग संतृप्त असतो, ज्याला वाईट चरबी देखील म्हणतात. यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढते, असे, अर्जेंटीनामधील मीट न्यूट्रिशनल इन्फॉरमेशन सेंटरच्या न्यूट्रिशनिस्ट मारिया डोलोरेस फर्नांडिस पेजोस यांनी सांगितले.
पेजोस यांच्या मते, "स्कीनसहित चिकन खाल्ल्याने कॅलरीचे प्रमाण चिकनच्या प्रत्येक पीससोबत 50 टक्क्यांनी वाढते. जर आपण स्किनलेस चिकनचा 6 टक्के स्तनाचा भाग खाल्ला तर आपल्या शरीराला 284 कॅलरीज मिळतात. पण जर चिकन स्कीनसोबत खाल्लं तर तुम्हाला 386 कॅलरीज मिळतील. हेच कारण आहे की लोकांना स्किनलेस चिकन खाण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून शरीरात जास्त कॅलरीज जाणार नाहीत.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वजन आणि उंचीनुसार जो व्यक्ती अगदी निरोगी आहे, तो वेळी स्कीनसोबत चिकन खाऊ शकतो. पिवळ्या आणि गुलाबी कोंबडीमध्ये कोण चांगले आहे. कोंबडीच्या आहारावर तिचा रंग अवलंबून असतो. मक्यामध्ये, ज्वारी आणि गव्हापेक्षा जास्त पिगमेंट असतात. काही देशांमध्ये खवय्यांची आवड लक्षात घेऊन चिकनचे मांस पिवळसर रंगाचे असावे म्हणून त्यांच्या आहारात नैसर्गिक रंग मिसळले जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.