Ginger Garlic Chatani : हिवाळ्यात जेवणाची चव वाढवा 'या' हेल्दी आणि टेस्टी चटणीने

हिवाळ्यात भूक वाढलेली असते. बाहेरचं वातावरण थंड असल्याने शरीरात उर्जा राखणं आवश्यक असल्याने ही चटणी उपयुक्त ठरते.
Ginger Garlic Chatani
Ginger Garlic Chataniesakal
Updated on

Ginger Garlic chutney Recipe : हिवाळ्यात बाहेरचं वातावरण गार झालेलं असतं. आपली भूक वाढलेली असते. अशात जर योग्य पदार्थ खाल्ले नाहीत तर वजन वाढण्याचं टेंशन असतं. त्यामुळे या काळात टेस्टी आणि हेल्दी पदार्थ खाणं आवश्यक असतं. म्हणूनच जर ही आलं लसणाची चटणी वापरली तर जेवणाची चवही वाढते आणि आरोग्यही राखते.

आरोग्यासाठी उपयुक्त

आलं, लसूण पदार्थाची चवतर वाढवतंच पण त्याबरोबर या पदार्थांची प्रवृत्ती गरम असल्याने शरीराची उष्णता वाढवण्यासाठीही याचा फार फायदा होतो. त्यामुळे हिवाळ्यात थंडीने होणाऱ्या आजारांमध्ये, सर्दी खोकल्यावर मह्णून ही चटणी उपयुक्त ठरते. यातील जीवनसत्व शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवते.

Ginger Garlic Chatani
Oats Bhurji Recipe : सकाळी नाश्त्याला खा हेल्दी फुड; ओट्स आणि अंड्याची ही रेसिपी नक्की ट्राय करा

चटणी बनवण्यासाठी साहित्य

  • आले - १ इंच

  • लसूण - २०-२५ कळ्या

  • चिंच - १ टेबल स्पून

  • लाल मिरची पूड - १ टी स्पून

  • मोहरीचं तेल - १ टेबल स्पून

  • मीठ चवीनुसार

Ginger Garlic Chatani
Paneer Recipe : बाजारात मिळतं तसं पनीर घरीच तयार करायला शिका

कृती

सोललेला लसूण आणि आल्याचे तुकडे घ्या. एका कढईत तेल घेऊन गरम करा. त्यात आलं लसूण परता. त्यात चिंच टाका आणि सर्व साधारण १ मिनीट परता. नंतर गॅस बंद करा. मिश्रण गार झाल्यावर मिक्सरमध्ये घ्या. त्यात लाल तिखट आणि मीठ घालून बारीक करून घ्या. यात पाणी घालू नये. गरज वाटल्यास थोडं तेल घालावं.

ही चटणी १० दिवस चांगली राहते. जेवताना ताटाला लावली तर नक्कीच तोंडाला चव येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.