चटपटीत चवीचे गोबी धपाटे कसे बनवावे? जाणून घ्या रेसिपी

वेळेअभावी झटपट बनणाऱ्या काही रेसिपी आहेत, ज्या शरीरासाठी पोषक आहेत
चटपटीत चवीचे गोबी धपाटे कसे बनवावे? जाणून घ्या रेसिपी
Updated on

कोल्हापूर : पोहे, उपमा, पावभाजी, आंबोळी, इडली असे पारंपारिक नाश्ताचे पदार्थ आपण रोज बनवतो. सध्या अनेक महिला ऑफिस, घरकाम अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत असतात. अशावेळी वेगळी रेसिपी ट्राय करण्यासाठी महिलांना पुरेसा वेळ मिळत नाही. मग कधीतरी फावल्या वेळात त्या वेगळ्या डीश ट्राय करतात. वेळेअभावी झटपट बनणाऱ्या काही रेसिपी आहेत, ज्या शरीरासाठी पोषक आहेत. काहीजण अशा रेसिपींना आठवड्यातून एकदा फावल्या वेळात ट्राय करु शकता. अनेकांना फ्लॉवर आणि गोबीचे भाजी जेवणामध्ये खाण्यास पसंत नसते. परंतु हे दोन्ही घटक पोषकतत्वांसाठी महत्वाचे आहेत. म्हणून याचे पराठे बनवून तुम्ही हे कुटुंबियांना खायला देऊ शकता. यामुळे गोबी, फ्लॉवरमधील पोषक तत्वे शरीरात जाण्यात मदत होईल. मी बोलत आहे ते गोबी धपाटे किंवा पराठे याविषयी. ही एक सोपी आणि पोषकतत्वाची रेसिपी आहे. जी तुम्ही तुमच्या फावल्या वेळात कधीही बनवू शकता. शिवाय ही घरीच उपलब्ध असलेल्या घटकांपासून तयार होते. (gobi dhapate easy recipe with available material at home)

साहित्य -

  • गोबी किसून घेतलेला २ कप

  • लाल तिखट चवीनुसार

  • मीठ चवीनुसार

  • हिंग, जिरे, धने पावडर आवश्यकतेनुसार

  • तेल आवश्यकतेनुसार

  • बारीक चिरलेला कांदा २

  • बारीक चिरलेली कोथिंबीर आवश्यकतेनुसार

  • चिरलेली हिरवी मिरची २

  • आलं - लसून पेस्ट आवश्यकतेनुसार

  • गहू, मका, ज्वारी, नाचणी, तांदूळ, बेसण पीठ प्रत्येकी १/२ वाटी

चटपटीत चवीचे गोबी धपाटे कसे बनवावे? जाणून घ्या रेसिपी
अंडा-पालक रेसिपी सोडेल तुमच्या तोंडाला पाणी

कृती -

सुरुवातील गोबी स्वच्छ धूवून किसनीनच्या मदतीने बारीक किसुन घ्या. त्यानंतर गव्हाच्या पीठासह मका, ज्वारी, नाचणी, तांदूळ, बेसण ही पीठे एकत्र करुन त्याची सैलसर कणिक मळून घ्यावी. हे मळत असताना ते पीठ अधिक ओलं आणि पातळ होईल अशा पद्धतीने मळावे. आता किसलेला गोबी या मिश्रणात घाला. त्यानंतर या पिठात लाल तिखट, मीठ, आलं लसून पेस्ट, चिरलेला कांदा, मिरची घाला. या तयार मिश्रणात वरून हिंग, जिरे, धने पावडर घाला. तुमचे पराठ्याचे किंवा धपाट्याचे पीठ मळून तयार आहे. आता पोळपाट घेऊन त्यावर एक सुती कापड टाका. छोटा गोळा यावर ठेवून त्याला हाताने हळूवार गोलाकार पोळीसारखा आकार द्या. यानंतर अलगत हाताने थापटलेल्या पोळीला हळुवार लाटण्याच्या सहाय्याने लाटून घ्या. पॅन गरम झाल्यानंतर त्यात हा तयार पराठा किंवा धपाटा भाजून घ्या. भाजताना त्यावर तेल सोडा. मोठ्या गॅसवर दोन्ही बाजूंनी याला भाजून घ्या. तयार गरमा गरम पराठा तुम्ही दही किंवा सॉस सोबत खाऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()