Google Doodle: गुगल साजरा करत आहे 'पिझ्झा डे'

गुगलचं आकर्षक डूडल; जाणून घ्या पिझ्झाचा इतिहास
Google Doodle: गुगल साजरा करत आहे 'पिझ्झा डे'
Updated on

Google doodle pizza day: गुगलचं (Google) डूडलची (Doodle) नेहमीच चर्चा होत असते. गुगल डूडलच्या माध्यामातून अनेक महत्त्वाचे प्रसंग खास पद्धतीने साजरे करते. सेलिब्रेशनसोबतच गुगल त्या दिवसाच्या इतिहासाची माहितीही डूडलद्वारे देते. आज गुगल 'पिझ्झा डे' साजरा करत आहे. 6 डिसेंबर 2007 रोजी नेपोलिटन "पिझियुलो" बनवण्याची पद्धत युनेस्कोच्या प्रतिनिधी यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली होती. याच कारणामुळे आज गुगल डूडलमध्ये लोकप्रिय पिझ्झा डिशचा समावेश करण्यात आला आहे. आजच्या डूडलमध्ये काय खास आहे ते जाणून घेऊया.

Google Doodle: गुगल साजरा करत आहे 'पिझ्झा डे'
'पिझ्झा आणि स्ट्रॉबेरी विथ क्रीम' बस्स! : आणखी काय हवं...

पिझ्झाचा इतिहास (History of Pizza):

इजिप्तपासून रोमपर्यंतच्या प्राचीन संस्कृतींमध्ये शतकानुशतके टॉपिंगसह फ्लॅटब्रेडचा सेवन केला जात होतं. 17 व्या शतकाच्या उत्तरार्धात नैर्ऋत्य इटालियन शहर नेपल्स हे पिझ्झाचे (टोमॅटो आणि चीज असलेले पीठ) जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. पिझ्झा बनवण्याच्या पद्धतीत अनादी काळापासून आतापर्यंत अनेक बदल झालेले पाहायला मिळतात.

GOOGLE DOODLE PIZZA DAY-

गुगलच्या स्पेशल पिझ्झा डूडलवर क्लिक केल्यास त्यात पिझ्झाचे 11 मेनू दिसतील, ज्यामध्ये कटिंगचा पर्याय तुमच्यासमोर ठेवला जाईल. तो बरोबर कापल्यानंतर, Google तुम्हाला स्टार्स देईल. जे तुम्ही पुढेही शेअर करू शकता. विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही जितक्या चांगल्या पद्धतीने पिझ्झाचे स्लाइस कापता तितके जास्त स्टार्स तुम्हाला मिळतील.

Google Doodle: गुगल साजरा करत आहे 'पिझ्झा डे'
खाने में ट्विस्ट ; भाकरीचा ‘पिझ्झा’

पिझ्झाचे प्रकार (TYPES OF PIZZA)-

या मनोरंजक पिझ्झा गेममध्ये तुमच्या समोर 11 प्रकारचे पिझ्झा ठेवण्यात येणार आहेत, जे तुम्हाला एक एक करून कापावे लागतील. तुम्ही योग्यरित्या कट केल्यास, तुम्हाला स्टार्समध्ये रेटिंग मिळेल. चला त्या लिस्टमध्ये कोणत्या पिझ्झाचा समावेश आहे ते जाणून घेऊया.

मार्गेरिटा पिझ्झा (चीज, टोमॅटो, तुळस)

पेपरोनी पिझ्झा (चीज, पेपरोनी)

व्हाइट पिझ्झा (चीज, व्हाईट सॉस, मशरूम, ब्रोकोली)

कॅलाब्रेसा पिझ्झा (चीज, कॅलाब्रेसा, कांद्याचे रिंग होल ब्लॅक ऑलिव्ह)

मुझरेला पिझ्झा (चीज, ओरेगॅनो, संपूर्ण ग्रीन ऑलिव्ह)

हवाईयन पिझ्झा (चीज, हॅम, अननस)

मॅग्यारोस पिझ्झा (चीज, सलामी, बेकन, कांदा, मिरची)

तेरियाकी मेयोनेझ पिझ्झा (चीज, तेरियाकी चिकन सीवीड, मेयोनेझ)

टॉम यम पिझ्झा (चीज, कोळंबी, मशरूम, मिरची, लिंबाची पाने)

पनीर टिक्का पिझ्झा (चीज, कॅप्सिकम, कांदा, पेपरिका)

मिठाई पिज्जा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.