सध्या बाजारात द्राक्ष यायला लागली आहेत. बदलत्या वातावरणात शरीराचे (Body) संतुलन राखण्यासाठी द्राक्षे खाणे (Food) फायद्याचे ठरते. महत्वाचं म्हणजे बदलत्या ऋतूंनुसार तंदूरूस्त राहण्यासाठी आपल्या आहारात (Diet) थोडासा बदल करावा लागतो. त्यामुळे द्राक्ष खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे (Benefits) होऊ शकतात.
१) दाहक विरोधी गुणधर्म - द्राक्षामध्ये आढळणारे फ्लेव्होनॉइड्स आणि प्रोअँथोसायनिडिन हे रासायनिक घटक आपल्याला जळजळ कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे द्राक्ष खाल्ल्याने शरीराला आराम मिळू शकते.
२) कर्करोगावर प्रभावी- द्राक्षांमध्ये आढळणारे रेझवेराट्रोल हे अँटिऑक्सिडेंट शरीरातील कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करते. द्राक्षांमध्ये क्वेरसेटीन, अँथोसायनिन्स आणि कॅटेचिन्स अँटीऑक्सिडंट्स असतात. यांमध्ये कर्करोगाशी लढण्याचे गुणधर्म आहेत.
३) डोळ्यांसाठी फायद्याचे - अल्ट्रा-व्हायोलेट किरणांमुळे डोळ्याच्या नाजूक पेशींचे नुकसान होऊ शकते. पण द्राक्षांमध्ये द्राक्षांमध्ये आढळणारी संयुगे अल्ट्रा-व्हायोलेट किरणांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. द्राक्षातील ल्यूटिन आणि झेक्सॅन्थिन यासाठी उपयोगी ठरतात. कारण ते मोबाईल आणि टॅब्लेटमधील निळ्या प्रकाशापासून डोळ्यांचे संरक्षण करतात.
४) चिरतरूण ठेवण्यास मदत - द्राक्ष खाल्ल्याने उत्साह वाढतो. तसेच ती तुम्हाला तरूण ठेवण्यासाठीही मदत करू शकतात. Resveratrol SirT1 हा घटक जनुकाला उत्तेजित करतो. हा घटक पेशींच्या संरचनेवर तसेच पेशींचे संरक्षण करण्यास महत्वाचा असतो. तसेच तो दीर्घ आयुष्याशी संबधित असतो.
५) पचन व्यवस्थित होते- द्राक्षांमध्ये पाणी आणि फायबर असते. त्यामुळे ती खाल्लाने तुम्ही हायड्रेटेड राहता. शिवाय आतड्यांसंबंधी हालचाल नियमित ठेवण्यास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास द्राक्षे खाल्ल्याने मदत होते .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.