Green Chilli Bharta : हा झणझणीत पदार्थ खा अन् कंट्रोलमध्ये ठेवा तुमचं BP; लगेच नोट करा रेसिपी

हिरवी मिरची भरीत खूप चवदार आणि मसालेदार लागतं
Green Chilli Bharta
Green Chilli Bhartaesakal
Updated on

Green Chilli Bharta : चविष्ट गोष्टींचं नाव जरी घेतलं की लगेच तोंडाला पाणी सुटतं. मात्र बीपी, शुगरच्या रुग्णांना काहीही खाण्याआधी त्यांच्या आरोग्याचा एकदा विचार करावा लागतो. मात्र आता अशाच रुग्णांसाठी आम्ही खास झणझणीत रेसिपी घेऊन आलो आहोत ज्याने तुमचे ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहील आणि तुम्हाला या पदार्थाची चवही फार आवडेल. चला तर हा पदार्थ कोणता आणि याची रेसिपी काय ते जाणून घेऊया.

भरीत म्हटलं की डोळ्यासमोर पहिलं चित्र येतं ते वांग्याच्या भरत्याचं. म्हणूनच आजपर्यंत तुम्ही भरपूर वांग्याचा भरीत खाल्लं असेल. पण तुम्ही कधी हिरव्या मिरच्यांचं भरीत खाल्लं आहे काय? नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी हिरव्या मिरच्याचं भरीत बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. हिरव्या मिरचीचं भरीत हा एक राजस्थानी पदार्थ आहे, त्यामुळे तुम्हाला ही भरताची रेसिपी राजस्थानच्या शाही थाळीमध्ये सहज मिळेल. हिरवी मिरची भरीत खूप चवदार आणि मसालेदार लागतं. लंच किंवा डिनरसाठी तुम्ही ते सहज खाऊ शकता, चला तर मग जाणून घेऊया रेसिपी.

हिरव्या मिरच्यांचं भरीत बनवण्यासाठी लागणारी सामग्री

हिरव्या मिरच्या 200 ग्रॅम चिरलेल्या

मोहरी २ चमचे

बडीशेप दीड टीस्पून

मेथी १ टीस्पून

दही १/४ कप

हळद पावडर अर्धा टीस्पून

साखर अर्धा चमचे

लिंबाचा रस 1 टीस्पून

तेल 1 टीस्पून

चवीनुसार मीठ

Green Chilli Bharta
Ginger Candy Recipe : बदलत्या ऋतूत वारंवार खोकला उद्भवतोय? ही कँडी ठरेल फायद्याची, वाचा रेसिपी

असे बनवा हिरव्या मिरच्याचे भरीत

हिरवी मिरचीचं भरीत बनवण्यासाठी सर्वप्रथम कढई गरम करा.

नंतर त्यात मोहरी, बडीशेप आणि मेथीची दाणे घालून कोरडी भाजून घ्यावी.

यानंतर या सर्व गोष्टी थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून पावडर बनवा.

नंतर कढईत तेल टाकून गरम करण्यासाठी ठेवा. (Recipe)

त्यानंतर थोडी मोहरी आणि मेथीदाणे टाकून तळून घ्या.

नंतर त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून मऊ होईपर्यंत परतून घ्या.

यासोबतच मिरच्या भाजताना थोपटत राहा जेणेकरून त्या किंचित खडबडीत राहतील.

नंतर त्यात हळद घाला आणि सुमारे 30 सेकंद शिजवा.

यानंतर त्यात दही, मीठ आणि साखर घालून मिक्स करा.

नंतर त्यात बडीशेप, मोहरी आणि मेथीची भाजलेली पावडर घालून मिक्स करा.

यानंतर, पाणी कोरडे होईपर्यंत चांगले शिजवा.

झाले तुमच्या हिरवी मिरचीचं भरीत तयार आहे.

त्यानंतर तुम्ही ते थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर ते आणखी चवदार वाटतं.

यानंतर वर लिंबाचा रस, ओरेगॅनो किंवा हिरवी कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.