World Biryani Day : हैदराबादी बिर्याणीचे हे फायदे वाचाल, तर आठवड्यातून तीन वेळा खाल!

जुलै महिन्याचा पहिला रविवार हा बिर्याणी दिन म्हणून साजरा केला जातो.
World Biryani Day
World Biryani DayeSakal
Updated on

तसं तर बिर्याणी हा खवय्यांसाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे, चिकन लव्हर्सना बिर्याणी खाण्यासाठी कोणत्याही कारणाची गरज नसते. त्यातल्या त्यात हैदराबादी दम बिर्याणी म्हटलं, तर कित्येक लोक सण-वारही पाहत नाहीत. मात्र, या बिर्याणीचे आरोग्यासाठीही भरपूर फायदे असतात. दर वर्षी जुलै महिन्याचा पहिला रविवार हा बिर्याणी दिन म्हणून साजरा केला जातो.

बिर्याणीमध्ये तांदूळ असल्यामुळे कित्येक लोक याला अनहेल्दी समजतात. मात्र, हा समज खोटा आहे. योग्य प्रमाणात खाल्ल्यास, बिर्याणी आपल्या शरीराला भरपूर फायद्याची ठरू शकते. याला कारण म्हणजे, बिर्याणी बनवण्याची पद्धत, आणि त्यात वापरण्यात आलेले पदार्थ.

World Biryani Day
Donne Biryani: तुम्ही कधी डोने बिर्याणी बद्दल ऐकलं आहे का? कशी बनवायची ते पहा!

अँटीऑक्सिडंट

बिर्याणीमध्ये कित्येक प्रकारचे मसाले वापरले जातात. हळद, काळी मिरी, लसूण, आलं, केशर अशा सर्व गोष्टींमुळे बिर्याणीमध्ये Antioxydents चं प्रमाण भरपूर वाढतं. याचा आपल्या शरीराला फायदा होतो.

प्रोटीन

बिर्याणीमध्ये चिकन किंवा मटणाचा भरपूर प्रमाणात वापर केलेला असतो. त्यामुळे यात निव्वळ प्रोटीन मिळतं. प्रोटीन हे शरीरातील मसल वाढीसाठी फायद्याचं असतं.

World Biryani Day
Egg Biryani Recipe : अंडा बिर्याणी बनवण्याची याहून सोप्पी पद्धत तुम्हाला कोणीच सांगितली नसेल?

पचनासाठी मदत

बिर्याणी तयार करताना यात हळद आणि काळ्या मिरीचा वापर केला जातो. यात असलेल्या जीवनसत्वांमुळे पोट फुगत नाही. तसंच, यात असलेल्या आलं आणि जिऱ्यामुळे तुमचं शरीर डिटॉक्सिफाय होण्यास मदत होते. यामुळे पचनाच्या समस्या उद्बवत नाहीत. तसंच, पचनाची प्रक्रियाही वेगात होते.

भरपूर व्हिटॅमिन्स

बिर्याणीमध्ये असणाऱ्या कांदा, लसूण, आलं या गोष्टी केवळ तिला रुचकरच नाही, तर हेल्दीही बनवतात. या सर्व पदार्थांमध्ये एलिसिन, सल्फ्युरिक यॉगिक, मँगनीज, व्हिटॅमिन बी६, व्हिटॅमिन सी, कॉपर आणि सेलेनियम अशी जीवनसत्वं असतात. या गोष्टी आपल्या शरीराला फायद्याच्या असतात.

बिर्याणीचे एकूणच शरीराला भरपूर फायदे आहेत. मात्र, कोणतीही गोष्ट योग्य प्रमाणातच फायदेशीर ठरते. त्यामुळे बिर्याणीचे सेवनही योग्य प्रमाणातच करायला हवं. तसंच, डाएटमध्ये बिर्याणीचा किती वापर करता येईल याबाबत डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

World Biryani Day
World Biryani Day : अशी संडे स्पेशल टेस्टी चिकन बिर्याणी बघून तोंडाला सुटेल पाणी, लगेच नोट करा रेसिपी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.