बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांचे आरोग्य बिघडत चाललेले दिसून येत आहे. लहान शाळकरी मुले, तरुण आणि स्त्रिया तसेच प्रौढांमध्ये देखील फास्टफूड व जंकफूडचे घातक परिणाम दिसून येतात. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी जंक फूड खातात, मुलांच्या आहारावर त्यांच्या आरोग्याची गुणवत्ता अवलंबून असते. जंक फूड, कोल्ड्रिंग यामुळे लठ्ठ गटातील मुलांचे प्रमाण वाढत आहे.
शाळा व महाविद्यालयातील कॅन्टीनमध्ये आता घरगुती पोषणमूल्याचे पदार्थ देण्यात यावेत, असे निर्देश नुकतेच अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ने दिले आहेत. कॅन्टीनमध्ये कोणते खाद्य पदार्थ असावेत याची मार्गदर्शक तत्त्वेही देण्यात आली आहेत.
घातक मेदयुक्त प्रक्रिया पदार्थ
जंक फूड व तळलेले खाद्यपदार्थ
फ्रेंच फ्राइझ, समोसा, वडे, फ्राईड चिकन इत्यादींमध्ये मोठ्या प्रमाणात मेद असल्यामुळे लहान वयात मुलांना लठ्ठपणा व हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका निर्माण होतो.
सोडा (कोल्ड ड्रिंक्स)
सोड्यामध्ये नेहमीच्या प्रमाणापेक्षा अधिक साखर असते डाएट सोडा तर शरीराला अत्यंत घातक असतो. अधिक प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने काही तासांसाठी रोग प्रतिकारक शक्ती कमी होते त्यामुळे या काळात संसर्ग होण्याचा धोका वाढतो. सोड्यामुळे शरीरातील कॅल्शियम व मॅग्नेशियम सारख्या महत्त्वाच्या खनिजांचे प्रमाण कमी होते.
लाल मांस
लाल मांसामध्ये काही पौष्टिकमूल्य असली तरी त्यामध्ये मेद अधिक प्रमाणात असते, त्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी वाढते आणि जळजळ होते. तसेच त्यामधील विशिष्ट शर्करेमुळे हे प्रमाण वाढते.
प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ
मूलभूत पौष्टिकमूल्यांचा आभाव आणि घातक रसायनांचा समावेश असलेल्या प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थाचे अधिक प्रमाणात सेवन केल्यामुळे हळूहळू रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. अन्नपदार्थांवर जेवढी जास्त प्रक्रिया करावी तेवढेच त्या अन्नाचे पोषणमूल्य कमी होते.
रिफाईन केलेले धान्य
व्हाईट ब्रेड, व्हाईट पास्ता, पाव, बन्स असे पदार्थ रिफाईन केलेल्या पिठापासून तयार केले जातात.यामध्ये महत्त्वाच्या पौष्टिक मूल्यांचा विशेषत: व्हीट ब्रान फायबरचा अभाव असतो. हे पदार्थ तयार करताना सर्व फायबर निघून जाते आणि फक्त स्टार्च आणि काही प्रमाणात पौष्टिक मूल्य राहतात. अशा पदार्थांच्या सेवनामुळे वजन वाढण्यासोबतच बद्धकोष्ठतेचा देखील त्रास होतो त्यामुळे अशा प्रकारच्या पदार्थाचं कमी प्रमाणात सेवन करावे.
साखर
साखरेच्या अधिक सेवनाने अतिरिक्त कॅलरीज साचून राहतात, ज्यामुळे वजन वाढून लठ्ठपणा उद्भवतो तसेच यामुळे रोग प्रतिकारकशक्ती कमकुवत होऊ शकते. विविध प्रकारच्या प्रक्रियायुक्त फळांच्या ज्यूसेसमध्ये डेक्स्ट्रोज, माल्टोज, फ्रुक्टोज आणि रासायनिक रंग यांचे प्रमाण जास्त व नैसर्गिक फळ रसाचे प्रमाण कमी असते त्यामुळे अशी पेय रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवतात आणि मधुमेहासारखे घातक आजार जडतात.
वनस्पती /तूप /लोणी
चरबी, तेल आणि तूप लोणी यांमध्ये उच्च ऊर्जा असते आणि ते परिपूर्णता देतात परंतु तेल व तूप वनस्पती यांचा अतिरिक्त वापर टाळावा. विविध प्रकारच्या जंक व फास्ट फुड्समध्ये तेल व वनस्पती तूप यांचा पुनर्वापर होतो तसेच त्यांचा अतिरिक्त उष्मांक, चरबी आणि कोलेस्टेरॉल तसेच ट्रायग्लीसराईड म्हणजेच घातक लिपीड्स (चरबीचे) प्रमाण वाढवतात. अतिप्रमाणातील चरबी ही लठ्ठपणा, हृदयरोग, पक्षाघात आणि कर्करोग यांचा धोका वाढवते.
: शारदा पाटेकर, ९१५६०२७७३८
(सौ. के. एस. के. अन्नतंत्र महाविद्यालय, बीड)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.