निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहार अत्यंत गरजेचा आहे. मात्र रोजच्या आहारात सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे सकाळचा नाश्ता Morning Breakfast. सकाळीच्या वेळी पौष्टिक पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश केल्यास शरीराला आवश्यक ती सर्व पोषक तत्व मिळतात आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होते. Health Tips Morning Breakfast Tea with Bread or Toast may turn Harmful
सकाळचा नाश्ता करणं अत्यंत गरजेचं आहे. अनेकजण अलिकडे कामाच्या धावपळीमध्ये सकाळचा नाश्ता Breakfast करत नाहीत. तर काहीजण सकाळच्या वेळी चहा आणि चहासोबत रस्क म्हणजेच टोस्ट किंवा ब्रेड Bread खाणं पसंत करतात.
अनेकांसाठी चहा आणि ब्रेड हाच नाश्ता असतो. मात्र हा नाश्ता तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.
खरं तर अनेक घरांमध्ये सकाळची सुरुवातच गरमागरम चहा आणि रस्क किंवा ब्रेडने होते. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यत सकाळी नाश्त्यासाठी चहा टोस्ट खाणं पसंत करतात. मात्र यामुळे तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. पाहुयात चहा आणि रस्क खाण्याचे दुष्परिणाम
मेटाबोलिजमवर परिणाम
काही संशोधनानुसार रस्क किंवा टोस्टमध्ये ब्रेडहून अधिक कॅलरी असतात. १०० ग्रॅम रस्कमध्ये जवळपास ४०७ कॅलरी असू शकतात. जास्त कॅलरीमुळे ब्लड शुगर वाढण्यासोबतच वजन वाढण्याचा धोकादेखील वाढतो.
रस्क बनवण्यासाठी वापरण्यात येणारी सामग्री म्हणजेच यीस्ट, साखर, तेल आणि मैदा, हे सर्व आपल्यासाठी हानिकारक आहेत. या पदार्थांच्या सेवनामुळे डायरिया, बद्धकोष्ठता आणि मेटाबॉलिजम सारख्या समस्या निर्माण होवू शकतात.
हे देखिल वाचा-
ब्रेडदेखील हानिकारक
रस्कप्रमाणेच नाश्त्याला चहासोबत ब्रेड खाणं आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. व्हाईट ब्रेडमध्ये वापरण्यात आलेल्या प्रोसेस्ड पीठ आणि साखरेमुळे आरोग्याचं नुकसान होतं. यामुळे मधुमेह आणि हृदय रोगाचा धोका वाढू शकतो. यामुळे शरीरावर सूज आणि आतड्यांचे विकार उद्भवू शकतात.
मानसिक आरोग्यासाठी घातक
चहा आणि टोस्ट किंवा ब्रेडच्या सेवनामुळे आतड्यांचे विकार उद्भवल्याने त्याचा परिणाम इम्युनिटी आणि हार्मोन्सवर दुष्परिणाम होवून वजन वाढू लागतं. यामुळे तणाव वाढू लागतो आणि तुम्हाला कायम थकवा जाणवतो.
रस्क आणि ब्रेडमधील हे घटक हानिकारक
मैदा- मैदा हे एक प्रकारचं गव्हापासून तयार करण्यात आलेलं पीठ असलं तरी ते प्रोसेस्ड असतं. यामध्ये कोणत्याही प्रकराचे विटामिन, खनिजं किंवा प्रथिनं उपलब्ध नसतात.
साखर- जरी तुम्ही दिवसभर गोड पदार्थ खाणं टाळत असलात तरी केवळ दोन टोस्टमुळे मोठ्या प्रमाणात साखरेचं सेवन होत असतं. यामुळे शरीरातील कॅलरीचं प्रमाण वाढून वजन वाढू लागतं.
रिफाइंड ऑइल- रिफाइंड ऑइल हे एका प्रकारचं व्हेजीटेबल ऑइल असलं तरी ते देखील प्रोसेस्ड असतं. यामध्ये कोणत्याही प्रकारची पोषक तत्व नसून यामुळे शरीरावरील सूज वाढू शकते.
हे देखिल वाचा-
प्रिझर्वेटिव्ह, आर्टिफिशियल कलर- रस्क किंवा ब्रेड काही दिवस टिकावे यासाठी यामध्ये प्रिजर्वेटिव्ह वापरण्यात येतात. मात्र हे प्रिजर्वेटिव्ह आरोग्यासाठी हानिकारक असतात.
फूड कलर आणि रायझिंग एजंट- रस्कला ब्राउन कलर येण्यासाठी यामध्ये कॅरॅमल कलर वापरण्यात येतात. हे रंग आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्याच प्रमाणे ब्रेड आणि टोस्ट बेक करण्यासाठी यामध्ये यीस्ट तसचं इतर काही रायझिंग एजंट वापरले जातात. ज्यामुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होऊ शकतात.
यासाठीच सकाळचा नाश्ता हा हेल्दी असणं गरजेचं आहे. ज्या पदार्थांमध्ये विटामिन, प्रोटीन तसचं खनिज उपलब्ध असतात अशा पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असलेल्या पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश करणं गरजेचं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.