हेल्दी फूड : ग्लुटेनमुक्त आहार - काय खरे, काय खोटे!

ग्लुटेन शरीरासाठी अपायकारक आहे यात काही प्रमाणात सत्य नक्कीच आहेत.
हेल्दी फूड
हेल्दी फूडsakal
Updated on

कोरोनामुळे लागलेले लॉकडाउन उठून सर्वकाही पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. आज आपण अनेकांमध्ये दिसणाऱ्या अॅलर्जीबद्दल, ग्लुटेनबद्दल बोलणार आहेत.

ग्लुटेन म्हणजे काय?

ग्लुटेन एक प्रथिन असून, ते गव्हापासून बार्लीपर्यंतच्या अनेक धान्यांत आढळते. ते ब्रेड, पास्ता, पिझ्झा आणि तृणधान्यांमध्ये प्रामुख्याने असते. ग्लुटेनमधून आवश्यक पोषक घटकांना कोणताही पुरवठा शरीराला होत नाही. उदराचा आजार असणाऱ्यांनी ग्लुटेनचे सेवन केल्यावर प्रतिकारशक्ती प्रतिसाद देते. त्यामुळे ग्लुटेनयुक्त अन्न घेतल्यास त्यांच्या आतड्यांमध्ये व शरीराच्या इतर भागांमध्येही दाह निर्माण होतो आणि त्या अवयवांचे नुकसानही होते.

ग्लुटेन शरीरासाठी अपायकारक आहे यात काही प्रमाणात सत्य नक्कीच आहेत. सुरवातीला उल्लेख केल्याप्रमाणे उदारासंदर्भातील आजार असलेल्यांनी ग्लुटेन टाळल्यास त्यांच्या आजारी पडण्याचे प्रमाण कमी होऊन त्यांची तब्येत उत्तम राहाते. त्यांच्यासाठी ग्लुटेनमुक्त आहार आवश्यकच आहे. त्यानंतर काही लोकांचे वर्णन ग्लुटेन सेन्सेटिव्ह असे केले जाते. त्यांच्या उदरासंदर्भातील आजाराच्या चाचण्या नकारात्मक असतात, मात्र ग्लुटेनयुक्त आहार घेतल्यास त्यांच्यात पोट फुगणे, अतिसार, ओटीपोटीत वेदना अशी लक्षणे आढळून येतात.

हेल्दी फूड
इनर इंजिनिअरिंग : मानव जातीचे खरे कल्याण

गव्हाची अॅलर्जी होण्याचे कारण त्वचेच्या आजारासंबंधीच्या चाचण्या केल्यावर सापडते. मात्र, अनेकांमध्ये या आजाराचे कारण अज्ञात राहते. त्याचे वर्णन काहीजण ‘उदराचा संबंध नसलेली ग्लुटेन हायपरसेन्सेटिव्हीटी’ असे करतात. ही व्याख्या अत्यंत वरवरची असून, तिचा अधिक अभ्यास करणे गरजेचे आहे. तुम्हाला ग्लुटेनयुक्त आहार घेतल्यानंतरही चांगले वाटत असले, पचनाच्या कोणत्याही समस्या नसतील तर या आहाराच आनंद घ्या. मात्र, तुमच्या समस्यांचा संबंध ग्लुटेनशी असेल किंवा तुम्हाला मोठ्या प्रमाणात कारण समजत नसलेली लक्षणे आढळत असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

हेल्दी फूड
चेतना तरंग : ही गोष्ट स्मरणात असू द्या!

उदराच्या आजाराची लक्षणे

  • अतिसार

  • ओटीपोटात दुखणे

  • वजन कमी होणे आणि अपचन

  • पोट फुगणे किंवा गच्च भरलेले वाटणे

  • अंगावर खाजवणारे पुरळ.

  • (मुलांमध्ये) शारीरिक वाढ खुंटणे.

उदराचे आजार शोधण्यासाठी काही मान्यताप्राप्त चाचण्या आहेत. त्यामध्ये विशिष्ट प्रतिपिंडे शोधणाऱ्या रक्ताच्या चाचण्या, जनुकीय चाचण्या व आतड्याच्या बायोप्सीचा सामावेश आहे. या चाचण्यांतून तुम्हाला आहारात कोणते पदार्थ टाळायला हवेत, हे समजते.

हेल्दी फूड
शोध स्वतःचा : हळूहळू, मग अचानक!

आपण सध्या ग्लुटेनबद्दल प्रचंड जागरूकता असलेल्या काळात जगत आहोत, यात शंका नाही. ही चांगली गोष्ट आहे का? तुम्हाला उदरासंबंधीत आजार असल्याच नक्कीच आहे. ज्या लोकांना ग्लुटेनमुक्त अन्न घेणे आवश्यक आहे, त्यांना तसे अन्न सहज उपलब्ध होते आहे. पदार्थांवर ते ‘ग्लुटेन फ्री’ असल्याचे लेबल पाहायला मिळते, जे पूर्वी शक्य नव्हते. मात्र, ग्लुटेनच्या धोक्यांबद्दल फुगवून सांगितले जाते व त्याचा मार्केटिंगसाठी उपयोगही केला जातो आहे. तुमच्या तब्येतीची काळजी घेणे तुमच्या आणि तुमच्या डॉक्टरच्या हातात आहे, एखादा सेलिब्रिटी किंवा पुस्तकाच्या लेखकाच्या हातात नाही, हे लक्षात असू द्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()