अनेकदा पालकांना त्यांच्या मुलाच्या उंचीबद्दल काळजी वाटते. कारण काही मुलांची उंची त्यांच्या वयानुसार वाढत नाही. सर्व मुलांच्या वाढीचा आणि विकासाचा दर वेगळा असतो. काही खूप वेगाने वाढतात तर काहींना इतरांपेक्षा थोडा जास्त वेळ लागतो.
मुलांची उंची न वाढण्यामागील एक कारण मुलांच्या आहारात आवश्यक पोषक तत्वांचा अभाव हे देखील असू शकते. तसेच, त्यामागे अनुवंशिकता हे देखील कारण असू शकते. तसेच, मुलं हिरव्या भाज्या खात नाहीत, त्यामुळेही त्यांना अशा समस्येला सामोरे जावे लागते.