Kodo Millet चे कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहासोबत अनेक विकारांमध्ये होतात असंख्य फायदे

Kodo Millet आकाराने लहान असलं तरी या धान्याचे देखील आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. कोडो मिलेटमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, व्हिॅटमिन्स, खनिजं आणि मॅग्नेशियम उपलब्ध असतं
Kodo Millet चे फायदे
Kodo Millet चे फायदेEsakal
Updated on

गेल्या काही वर्षांमध्ये अनेकजण पुन्हा एकदा भारतातील पारंपरिक धान्यांकडे वळू लागले आहेत. नाचणी, ज्वारी, बाजरी या धान्यांसोबतच ओट्स, बार्ली तसचं क्विनोवा अशा विविध भरड धान्यांचा Millets आहारात पुन्हा एकदा समावेश करण्याकडे आता कल वाढताना दिसत आहे. Healthy Food Tips Kodo Millet for diabetes and cholesterol control

यापैकीच एक भारतातील अत्यंत पारंपरिक धान्य म्हणजे कोडो मिलेट Kodo Millet. कोडो मिलेटला कोदरा असंही म्हंटलं जातं. भारतात उत्तर प्रदेश आणि दक्षिण भारतात कोदऱ्याचं उत्पादन घेतलं जातं. कोडो मिलेट्स किंवा कोदरा या धान्याचे Food Grains दाणे आकाराने नाचणीप्रमाणेच लहान असून रंग हलकासा लाल असतो.

आकाराने लहान असलं तरी या धान्याचे देखील आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. कोडो मिलेटमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन्स, खनिजं आणि मॅग्नेशियम उपलब्ध असतं.

ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेल्या आणि फायबरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असलेल्या या धान्याच्या सेवनामुळे मधुमेह नियंत्रणात Diabetes Control राहण्यासोबतच, वजन कमी करण्यासाठी किंवा कोलेस्ट्रॉलची समस्या कमी करण्यासाठी विविध फायदे आहेत. तेव्हा या धान्याचे आरोग्यासाठी विविध फायदे जाणून घेऊयात.

मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर

मधुमेही रुग्णांसाठी कोडो मिलेट किंवा कोदऱ्याचं सेवन फायदेशीर ठरू शकतं. कोडो मिलेटचा ग्लायसेमिक इंडेक्स हा ५०-६० इतका असून यात मोठ्या प्रमाणात फायबरचं प्रमाण आहे. तसचं यातील अँटीडायबेटिक गुणधर्मांमुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.

हे देखिल वाचा-

Kodo Millet चे फायदे
Millet Food : हडप्पा संस्कृतीतील लोकही खात होते 'हे' अन्न

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत

कोडो मिलेट्समध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स उपलब्ध असतात. तसंच कोडो मिलेट्समध्ये रक्त शुद्ध करण्यासाठी आवश्यक गुणधर्म असल्यामुळे रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. तसंच कोडो मिलेट्समध्ये असलेल्या फायबरमुळे देखील कोलेस्ट्रॉलची समस्या कमी होते.

वजन नियंत्रणात राहण्यास मदत

कोडो मिलेट्समध्ये मोठ्या प्रमाणात फायबर उपलब्ध असल्याने जास्त काळ पोट भरलेलं राहतं. परिणामी सतत खाण्याची इच्छा होत नाही आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

कोडो मिलेट्सचे इतर आरोग्यदायी फायदे

कोडो मिलेट्समध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम उपलब्ध असल्याने हाडांच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

कोडो मिलेट्सच्या सेवनामुळे डेंग्यू किंवा इतर कारणांमुळे शरीरातील प्लेटलेट्स कमी झाल्या असतील तर त्या पुन्हा तयार होण्यास मदत होते.

कोडोमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न उपलब्ध असल्याने एनिमियाची समस्या दूर होते.

कोडो किंवा कोदराच्या सेवनामुळे मुळव्याधीचा त्रास कमी होतो.

कोडो मिलेटमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर उपलब्ध असल्याने पचनासंबंधीच्या आणि पोटाच्या समस्या देखील दूर होतात.

अशा प्रकारे जवळपास ७०० वर्ष जुन्या या धान्याच्या सेवनाचे आरोग्यासाठी विविध फायदे आहेत. तेव्हा तुम्ही तुमच्या आहारात कोडो मिलेटचा समावेश करू शकता. कोडो मिलेटपासून खिचडी, उपमा किंवा कोडोच्या पिठाची भाकरी किंवा डोसे या रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता.

हे देखिल वाचा-

Kodo Millet चे फायदे
Millet Food: बाजरीची बिस्किटे, बाजरीचा हलवा, झुणका-भाकरीचा थेट परदेशप्रवास..!!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.