सायंकाळच्या चहासोबत नाश्त्याची तयारी करताय?, झटपट तयार होणारी रेसिपी आजच ट्राय करा

क्रिस्पी आणि हेल्दी पनीर ब्रेड रोल ही सोपी रेसिपी तुम्ही काही वेळात ट्राय करु शकता.
healthy paneer bread recipe
healthy paneer bread recipe
Updated on

जर तुम्ही सांयकाळी चहासोबत काही आरोग्यदायी पदार्थ खाणे पंसत करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी उपयोगी आहे. झटपट तयार होणारी एखादी रेसिपी तुम्ही शोधत असाल तर तुमच्यासाठी ही डिश परफेक्ट आहे. जी चवीला बेस्ट आहेच, शिवाय हेल्दीही आहे. क्रिस्पी आणि हेल्दी पनीर ब्रेड रोल ही सोपी रेसिपी तुम्ही काही वेळात ट्राय करु शकता. तुम्हाला ब्रेडची कुरकुरीत चव, पनीरचा मऊपणा आणि चीजची चव असे अनेक घटक यात एकत्र मिळतील. या रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे घरातील अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारी आहे. चला तर मग आज आपण जाणून घेऊया ही टेस्टी रेसिपी कशी बनवायची...

healthy paneer bread recipe
उकडलेले कणीस खाऊन कंटाळलाय तर स्वीट कॉर्नपासून बनवा 'या' तीन नव्या रेसिपीज

पनीर ब्रेड रोल बनवण्यासाठी साहित्य

  • 6 तुकडे ब्रेड

  • 1 कप पनीर

  • 1 टीस्पून आले आणि लसूण पेस्ट

  • 4 घन चीज

  • 2 टीस्पून लाल तिखट

  • 1/4 टीस्पून जिरे पावडर

  • 1/4 टीस्पून गरम मसाला

  • 2 टीस्पून टोमॅटो सॉस

  • 1/4 टीस्पून आमचूर पावडर

  • कोथिंबीरीची पाने

  • चवीनुसार - मीठ

  • 2-3 चमचे तेल

पनीर ब्रेड रोल बनवाण्यासाठी कृती

पनीर ब्रेड रोल बनवण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये थोडे बटर टाका. यानंतर त्यात कांदा परतून घ्या. सर्व गोष्टी एकत्र नीट मिसळून घ्या. यानंतर या मिश्रणात चीज घालून गॅस बंद करा. स्टाफिंगसाठी पनीरचे थोडे सारण तयार करुन घ्या. आता ब्रेडच्या साईटच्या बाजू कापून काढा. रोलिंग पिनच्या मदतीने ब्रेड लांब आणि पातळ करा. आता यावर हिरवी चटणी टाका आणि सगळीकडे पसरवून लावून घ्या.

healthy paneer bread recipe
Chole Recipe : घरीच रेस्टॉरंट स्टाइलमध्ये मसालेदार छोले कसे बनवावे, पाहा रेसिपी

यानंतर थोडेसे पनीरचे मिश्रण घेऊन ब्रेडवर ठेवून रोल बनवा आणि काठाला थोडे पाणी लावत ते बंद करुन घ्या. आता गॅसवर तवा ठेवा आणि त्यात तेल टाका आणि ब्रेड रोल मध्यम आचेवर थोडा वेळ भाजून द्या आणि परतत राहा. नंतर ब्रेडला ब्रशच्या सहाय्याने थोडेसे तेल लावून उलटे करून चारही बाजूंनी भाजून घ्या. तुमचा ब्रेड रोल तयार आहे. गरमागरम चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.