आजकाल अनेक मुले अभ्यासासाठी घरापासून दूर इतर शहरात राहतात. यानंतर त्यांना कामासाठीही घरापासून दूर राहावे लागते. जेव्हा तुम्ही एकटे राहता तेव्हा तुम्हाला सर्वकाही स्वतःच व्यवस्थापित करावे लागते. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतची व्यवस्था स्वत:लाच करावी लागते. एकटे राहणारे लोक सकाळी इतके लवकर उठतात की त्यांना चविष्ट नाश्ताही करता येत नाही.
कोणता नाश्ता ते पटकन तयार करून खाऊ शकतात हे त्यांना माहीत नसते. जवळजवळ प्रत्येक बॅचलरला या समस्येचा सामना करावा लागतो. तसेच, घराबाहेर एकटे राहणारे वृद्ध, वृद्धाश्रमात राहणारे आजी-आजोबा यांनाही नाश्ता बनवून खायला घालणारं कोणी नसतं. (Healthy Breakfast Recipe)