Healthy Snacks : मुलं वांगी खात नाहीत? मग ट्राय करा त्या बदल्यात ही रेसिपी

मुलांचे खाण्यापिण्याचे नाटकं असतात
Healthy Snacks
Healthy Snacksesakal
Updated on

Healthy Snacks : मुलांचे खाण्यापिण्याचे नाटकं असतात, त्यांना मोजून तीन चार भाज्याच खायच्या असतात. बाकी कोणतीही भाजी केली तर ते नाटकं करत खात नाहीत.. पण अशाने त्यांना ताकद कशी मिळेल याकाळजीने आई बाबा त्रस्त असतात. या न खाणाऱ्या भाज्यांमधली सर्वात महत्वाची भाजी म्हणजे वांगी. पण तुम्ही याच टिपीकल वांग्याला जरा हटक्या पद्धतीने मुलांना खाऊ घालू शकतात, ती रेसिपी म्हणजे वांग्याची भजी.

Healthy Snacks
Breakfast Recipes : रोज नाश्त्यात वेगळं काय बनवायचं? मग वाचा हटके डिशेसची रेसिपी फक्त एका क्लिकवर

साहित्य:

- 1 वांग

- 1/2 डाळीचं पीठ

- 1 टिस्पून तांदूळ पिठ

- 1/2 टिस्पून हळद

- 1 टिस्पून तिखट

- 1/4 टिस्पून जिरे

- चवीपुरते मिठ

- तळण्यासाठी तेल

Healthy Snacks
Yoga At Night : शांत झोपेसाठी रोज रात्री झोपण्याआधी करा फक्त हे आसन

कृती:

1) वांग्याचे गोल पातळ काप करा. मिठाच्या पाण्यात काप 10 मिनीटं घालून ठेवा.

2) डाळीच्या पिठात पाणी घालून गुठळ्या न होता नेहमी बटाटे वड्यासाठी जितके घट्ट भिजवतो त्यापेक्षा थोडे पातळ भिजवा, ज्यामुळे वांग्याच्या कापांना पिठाचं कमी आवरण होईल आणि थोडा कुरकूरीतपणा येईल.

3) डाळीच्या पिठात तांदळाच पिठ, लाल तिखट, जिरे, मिठ, हळद घाला. जर घरात असेल तर थोडा ओवा, चिरलेली कोथिंबीर घाला.

4) कढईत तेल गरम करा. डाळीच्या पिठात वांग्याचे काप बुडवून तळून काढा. हिरवी चटणी किंवा लसणाच्या चटणीबरोबर गरम गरम भजी सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.