Independence Day 2022: पौष्टिक झटपट तिरंगी ढोकळा कसा तयार करायचा?

यंदा आपण भारताचा (India) 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असून संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे.
Healthy Tirangi Dhokla Recipe
Healthy Tirangi Dhokla RecipeEsakal
Updated on

यंदा आपण भारताचा (India) 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असून संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. या महोत्सवांतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा (har ghar tiranga) हे अभियान साजरा होत आहे. अशातच आज आम्ही तुम्हाला 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर तुमच्या मुलांसाठी खास पौष्टिक झटपट तिरंगी ढोकळा कसा तयार करायचा ? याची रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य:

दिड कप जाड रवा

एक कप दही

चवीनुसार मीठ

अर्धा कप किसलेलं गाजर

अर्धा कप कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची,आलं पेस्ट

अर्धा चमचा इनो फ्रुटसॉल्ट

चवीनुसार मीठ

पाणी

दोन चमचे तेल

मोहरी

तीळ

चार ते पाच हिरव्या मिरच्यांची फोडणी

Healthy Tirangi Dhokla Recipe
Bottle Guard: दुधी भोपळ्याची साल असते पौष्टिक; सालीच्या दोन रेसिपी नक्की ट्राय करा

कृती:

प्रथम एका बाऊलमध्ये रवा घ्या त्यात मीठ आणि दही टाकून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.

भिजवलेल्या रव्याचे तीन सारखे भाग करून घ्यावे.

आता गाजर किसून घ्या आणि मिक्सर मध्ये घालून थोडे पाणी घालावे आणि गाजराची बारीक पेस्ट करून घ्यावी.

आता हिरव्या रंगासाठी कोथिंबीर मिरची आलं मिक्सर मध्ये वाटून बारीक पेस्ट करून घ्यावी.

त्यातील एका भागात थोडे पाणी घालून एकजीव करावा. मिश्रण अगदी पातळ किंवा अगदी घट्ट करू नये.

या मिश्रणाची अगदी मिडीयम कन्सिस्टन्सी ठेवावी.

हा झाला आपला पांढरा रंग.

रव्याच्या मिश्रणाच्या दुसऱ्या भागात तयार केलेली गाजराची पेस्ट घालावी. आता यात पाणी घालू नका तसंच हवा असल्यास ऑरेंज कलर घालून मिश्रण व्यवस्थित ढवळा. आता या मिश्रणात जीरावन मसाला घालून मिश्रण परत एकजीव करावे.

रव्याच्या मिश्रणाच्या तिसऱ्या भागात कोथिंबीर पुदिना मिरची आलं पेस्ट घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. हवा असल्यास हिरवा फूड कलर घालून मिश्रण परत एकदा एकजीव करा.केसरी आणि हिरव्या मिश्रणाची टेस्ट करून बघावी. मिश्रणात गरज असल्यास मीठ टाकावे.

ढोकळ्याच्या भांडयाला थोडेसे तेल लावून घ्यावे आणि ढोकळे पात्रात पाणी गरम करण्यास ठेवा. पाण्याला उकळी आली की ढोकळ्याच्या केशरी मिश्रणात पाव चमचा इनो घालून हलकेच मिक्स करा आणि ढोकळ्या चे भांडे स्टीमर मध्ये पाच ते सात मिनिटे स्टीम करण्यासाठी ठेवावे.

7-8 मिनिटांनी टूथपिक घालून चेक करा.

आता रव्याच्या पांढरा मिश्रणात पाव चमचा इनो घालून मिश्रण हलकेच ढवळून घ्या आणि सेट झालेल्या केशरी मिश्रणावर हलकेच सर्व बाजूंनी पसरून घ्यावे. शक्यतो मध्यभागी खड्डा करावा म्हणजे ढोकळा चांगला फुलतो आता आता हे मिश्रण पण पाच ते सात मिनिटं स्टीम करून घ्या नंतर टूथपिक ने चेक करा.

रव्याच्या हिरव्या मिश्रणात पाव चमचा इनो घालून मिश्रण ढवळून घ्या आणि हे मिश्रण सेट झालेल्या पांढऱ्या मिश्रणावर हलकेच सर्व बाजूंनी पसरवून घ्या. आणि हे मिश्रण पण पाच ते सात मिनिट स्टीम करून घ्या नंतर टूथ पिक ने चेक करा.

गॅस बंद करा आणिआता हा तिरंगी ढोकळा दहा मिनिटे स्टीमर मध्ये तसाच ठेवा.दहा मिनिटांनी हा ढोकळा बाहेर काढून पूर्णपणे थंड होऊ द्यावा नंतर चाकुने edges हलकेच सोडवाव्यात आणि एका प्लेटमध्ये ढोकळ्या चे भांडे पालथे टाकावे म्हणजे ढोकळा सुटून येतो.

आता या ढोकळ्याचे चाकुने काप करून घ्यावे. पळी मध्ये तेल मोहरी ,हिंग, मिरच्यांचे तुकडे,तीळ यांची चरचरीत फोडणी देऊन घ्यावी. आणि ती फोडणी तिरंगी ढोकळ्यावर पसरवावी. असा तयार झालेला ढोकळा डिश मध्ये काढून सर्व्ह करा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.