History Of Making Chutney : मुघल सम्राट शहाजहान आजारी पडला म्हणून आपल्याला मिळाली हिरवी चटणी, कसं ते जाणून घ्या!

भारतीय खाद्यपदार्थात चटणी आणि लोणचे यांना खूप महत्त्व आहे
History Of Making Chutney :
History Of Making Chutney : esakal
Updated on

 History Of Making Chutney : आपल्या खाद्यसंस्कृतीत विभिन्न पदार्थ आहेत. यातील प्रत्येक पदार्थाला एक विशेष पार्श्वभूमी आहे. प्रत्येक पदार्थ खाण्यामागे एक आयुर्वेदीक फायदा आहे. आपल्याकडे पाडव्याला कडुलिंब खातात, तर श्रावणात शेवग्याच्या पाल्याची भाजीही खातात.

तसंच, वेगवेगळ्या चटपटीत पदार्थांची चव वाढवणारी चटणी तुम्हाला भारतात कशी आली. आणि ती पहिल्यांदा कशी बनवली गेली, हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.

भारतीय खाद्यपदार्थात चटणी आणि लोणचे यांना खूप महत्त्व आहे. चटणीची आंबट, गोड किंवा मसालेदार चव  जेवणाची चव वाढवते. हे बऱ्याच काळासाठी साठवले जाऊ शकते. जे प्रवासादरम्यान अन्न ताजे ठेवण्यास मदत करते. धणे, पुदिना, कोथंबिर, नारळ आंबा आणि लसूण यापासून बनवलेल्या चटण्या लोकप्रिय आहेत.

History Of Making Chutney :
Guava Chutney Recipe: कच्च्या पेरूची बनवा चविष्ट चटकदार चटणी, जाणून घ्या सोपी रेसिपी...

परंतु भारतात इतर अनेक प्रकारच्या चटण्या आहेत. भारतात चटणी बनवण्याची सुरुवात कधीपासून झाली. या चटकदार पदार्थाचा इतिहास काय आहे. तिचे मुघल सम्राटाशी काय नाते आहे याबद्दल जाणून घेऊयात.

भारतातील चटणीचा इतिहास खूप जुना आहे. 17 व्या शतकात चटणीचा उगम झाला असे मानले जाते. एकदा मुघल सम्राट शहाजहान आजारी पडला होता. तेव्हा अनेक वैद्य झाले तरी शहाजहानला बरे वाटत नव्हते. तेव्हा एका वैद्याने साधे नाहीतर काहीतरी पचणारं पण मसालेदार पदार्थ खाण्यास सांगितले.

शाहजहानच्या स्वयंपाक्याला प्रश्न पडला की मसालेदार पण ज्याने पित्त होणार नाही असा काय पदार्थ बनवावा. त्यावर शांतपणे विचार करून स्वयपाक्याने शक्कल लढवली.

History Of Making Chutney :
Raw Mango Pudina Chutney :  झटपट तयार होणाऱ्या कैरी-पुदिना चटणीचे अनेक फायदे!

स्वयपाक्याने एखाद्या पदार्थाची लज्जत वाढवणारे पदार्थ निवडले. यात त्याने कफ प्रतिबंधकही आहे असा पुदिना घेतला. तर, धने, जिरे, लसूण आणि सुंठ यांसारख्या गोष्टी एकत्र केल्या.

या गोष्टींना स्वच्छ करून त्यांची बारीक पेस्ट बनवली. त्याकाळात मिक्सर नव्हते त्यामुळे असे मसाले हातानेच पाट्यावर वाटले जायचे. त्यामुळे पदार्थ अधिकच चवदार बनायचा.

पाट्यावर वाटून स्वयंपाकाने सर्वांची पेस्ट बनवली. अन् चटणीमध्ये आवश्यकतेनुसार मीठ, मिरची आणि इतर मसालेही टाकले. तयार झालेली चटणी आधी वैद्यबुवांनी खाल्ली अन् नंतर बादशहांना देण्यात आली. या चटणीमुळे बादशहाला बरे वाटले. तेव्हापासून हा पदार्थ प्रत्येक उत्सवात ताटाला लावला जाऊ लागला.  

History Of Making Chutney :
Dahi Chutney Recipe: दहीचा रायताच नाही तर चटणीही बनवली जाते, जाणून घ्या रेसिपी

चुकून चटणीचा शोध लागला!

17 व्या शतकात चटणीचा उल्लेख केला गेला असेल.  परंतु अनेक इतिहासतज्ज्ञांच्या मते, चटणीसा हजारो वर्षांचा इतिहास आहे. हे शक्य आहे की आपल्या पूर्वजांनीही कच्च्या गोष्टी बारीक करून घट्ट पेस्ट बनवली होती. चुकून किंवा अपघातामुळे चटणीचा शोध लागला असे अनेक इतिहासकार सांगतात. चटणी बनवण्यासाठी विविध प्रकारची फळे आणि विविध मसाले देखील वापरले जातात.

भारतात चटणीचा प्रसार कसा झाला?

मुघल काळात चटणीचा प्रसार भारताच्या विविध भागात झाला. मुघल शासकांनी चटणीसह अनेक नवीन पदार्थ आणि मसाले भारतात आणले. मुघलांनी चटणीचा प्रसार भारताच्या विविध भागांमध्ये केला होता. ज्यामुळे ती भारतीय पाककृतीचा अविभाज्य भाग बनली होती.

आज भारतात चटणीचे अनेक प्रकार आहेत. काही लोकप्रिय चटण्यांमध्ये आंबा, दही, धणे, पुदिना, लसूण, मिरची, चिंच आणि फळे आणि भाज्यांच्या चटण्यांचा समावेश होतो. चटणी हा भारतीय जेवणाचा महत्त्वाचा भाग आहे. हे अन्न स्वादिष्ट आणि पौष्टिक बनवते आणि भारताच्या समृद्ध वारशाचे प्रतीक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.