होळी या रंगांच्या उत्सवात घरोघरी वेगवेगळ्या प्रकारचे पारंपरिक पदार्थ बनवले जातात, जे केवळ चांगले दिसतात असे नाही, तर ते अतिशय चवदार देखील असतात. होळीच्या या सणानिमित्ताने खास कटाची आमटी हा पारंपरिक पदार्थ कसा तयार करायचा याची सविस्तर रेसिपी आजच्या लेखात आपण पाहणार आहोत.
साहित्य
1) खोबर्याचा किस
2) जिरे
3) मिरी
4) लवंगा
5) दालचिनी आणि तमालपत्र
6) तेल
7) मोहरी
8) जिरे
9) हिंग
10) हळद
11) लाल तिखट
12) कढीपत्ता
13) गोडा मसाला
14) मीठ
15) कोथिंबीर
16) दिड कप शिजलेली चणा दाळ
कृती
बर्याचदा पुरणपोळी सोबत कटाची आमटी केली जाते. त्यामुळे पुरणपोळी करताना चणाडाळ शिजवतो तेव्हा थोडे जास्त पाणी घालून डाळ शिजवावी. पुरणासाठी पाणी वाडग्यात निथळून घेताना निथळलेले पाणी एक कप असेल तर त्यासोबत दीड कप शिजवलेली डाळ बाजूला काढा किंवा चणाडाळ कुकरमध्ये नेहमीप्रमाणे मऊसर शिजवून घ्यावी.खोबर्याचा किस, जिरे, मिरी, लवंगा, दालचिनी आणि तमालपत्र असे वेगवेगळे मंद आचेवर थोडावेळ भाजून घ्यावे व नंतर मसाले मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. शिजलेली चणाडाळ आणि पाणी व्यवस्थित घोटून घ्या. एका पातेल्यात तेल गरम करून, मोहरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, कढीपत्ता घालून मिश्रणाला चांगली फोडणी द्या. वरून गरजेनुसार पाणी घालावे. आमटीला उकळी फुटली कि त्यात कुटलेला मसाला, गोडा मसाला घाला. मिश्रण ढवळून त्यात चिंचेचा कोळ आणि गुळ घाला. चवीपुरते मिठ टाका. वरून ओलं खोबरं आणि चिरलेली कोथिंबीर घालून एकदोन मिनिटे मंद आचेवर उकळू द्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.