कोरियन स्पायसी चिकन करा ट्राय

आता तुमच्या किचनमध्येच तयार करा कोरियन फूड
कोरियन स्पायसी चिकन करा ट्राय
Updated on

हॉलिवूड किंवा बॉलिवूड चित्रपट पाहणाऱ्यांपैकी अनेकांचा कल सध्या K drama पाहण्याकडे वळतोय. K drama म्हणजे कोरियन सीरिज किंवा मालिका. आतापर्यंत अनेक K drama लोकप्रिय होत असून जगभरातून त्यांना पसंती मिळत आहे. यात खासकरुन K drama मधील अभिनेत्यांना महिला वर्गाकडून विशेष पसंती मिळत आहे. त्यामुळेच अनेक तरुणी किंवा गृहिणी कोरियामधील संस्कृती, तेथील खाद्यपदार्थ यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच, अशा K drama फॅन महिलांसाठी आम्ही खास कोरियन स्पायसी चिकनची रेसिपी घेऊन आलो आहोत. (home-made-Korean-Spicy-Chicken-recipe)

साहित्य -

चिकन - १०-१५ बोनलेस चिकनचे तुकडे.

सॉससाठी लागणारं साहित्य -

सोया सॉस - ३ टेबल स्पून

लिंबाचा रस - अर्धा चमचा

व्हिनेगर - २चमचे

ब्राऊन शुगर- ३ चमचे

तिळाचे तेल - दीड चमचा

तीळ - १चमचा

आलं-लसूण पेस्ट - १ चमचा

मिरपूड - १ चमचा

कांद्याची पात - २ चमचे

लाल तिखट - आवश्यकतेनुसार

गोचुजांग (कोरियन चिली पेस्ट) - चवीप्रमाणे

मीठ - आवश्यकतेनुसार

कृती -

कोरियन स्पायसी चिकन करण्यासाठी आपल्याला प्रथम तीन वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड करुन घ्यावे लागतील. त्यातील पहिलं मुळा सॅलड पाहुयात.

१. मुळा सॅलड -

कोरियनमुळा घेऊन त्याचे पातळ उभे काप करुन घ्या. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, साखर,२ चमचे राईस व्हिनेगर,अर्धा चमचा मिरपूड, आणि कोरियन चिली पेस्ट घालून नीट मिक्स करुन घ्या.

२. काकडी सॅलड -

काकडी आणि गाजर बारीक चिरुन घ्या. त्यात चवीनुसार मीठ, साखर,१ चमचा लिंबाचा रस घाला आणि मिक्स करुन बाजूला ठेवा.

३. कांद्याच्या पातीचं सॅलड -

कांद्याची पात उभ्या पद्धतीने कापून घ्या. त्यात अर्धा चमचा सोया सॉस, अर्धा चमचा तिळाचं तेल, भाजलेले तीळ, चवीनुसार कोरियन चिली पेस्ट आणि मीठ घालून नीट मिक्स करुन घ्या.

कोरियन स्पायसी चिकनची कृती -

रेसिपीच्या सुरुवातीला आपण सॉस तयार करण्यासाठी लागणारं साहित्य पाहिलं होतं. हे सगळं साहित्य नीट एकत्र करुन सॉस तयार करुन घ्या. त्यानंतर तयार झालेल्या सॉसमध्ये धुवून स्वच्छ केलेले बोनलेस चिकनचे तुकडे अॅड करा. चिकन आणि सॉस नीट मिक्स झाल्यानंतर हे तयार मिश्रण १ तास फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवा.१ तासानंतर सॉसमध्ये चिकन मुरल्यानंतर बाहेर काढा. दुसरीकडे पॅनमध्ये तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात मुरलेल्या चिकनचे तुकडे घाला आणि छान मंद आचेवर चिकन शिजू द्या. साधारणपणे १० मिनिटांनंतर चिकनची दुसरी बाजून शिजवून घ्या. चिकन शिजत आल्यावर जर सॉस उरला असेल तर तो पॅनमध्येच चिकनसोबत टाकून द्या. चिकन दोन्ही बाजूने शिजल्यानंतर तुमचं कोरियन स्पायसी चिकन तयार. जेवताना या चिकनसोबत आपण तयार केलेले तीनही सॅलेड सर्व्ह करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()