Paneer Koliwada Recipe: चमचमीत कुरकुरीत खायचायं? घरीच बनवा 10 मिनिटात पनीर कोळीवाडा

पावसाळ्यात जर तुम्हाला भजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही पनीर कोळीवाडा ट्राय करु शकता.
how make Paneer koliwada recipe
how make Paneer koliwada recipe
Updated on

पावसाळ्याच्या थंड वातावरणात गरमा - गरम, चमचमीत पदार्थांचं डोहाळे सर्वांना लागलेले असतात. मग सर्वांच्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे कांदा भजी, वडा पाव, मिरची भजी आहाहाहा...पण तुम्ही कधी पनीर कोळीवाडा ट्राय केलं काय? आता कोळीवाडा म्हटल्यावर तुम्हाला कोकण अन् कोकणाली मासं आठवलं असतील ना...कारण कोळीवाडा हा शब्द आत्तापर्यंत आपण नॉनव्हेज पदार्थांमध्येचं ऐकला आहे. पण नाही हं असं काही.. हा शब्द शाकाहारी खवय्येसुद्धा वापरु शकतात.

पनीरचे अनेक प्रकार केले जातात. पनीरपासून तयार पदार्थ अनेकांना आवडतात. पण कदाचित कमी लोकांनी पनीर कोळीवाडा पदार्थ चाखला असेल किंवा नव्यानेच ही डिश ऐकली असेल. पावसाळ्यात जर तुम्हाला भजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही पनीर कोळीवाडा ट्राय करु शकता.

how make Paneer koliwada recipe
Upvasachi Kadhi Recipe: उपवासाला साबूदाण्यासारखा जड पदार्थ खाण्यापेक्षा हलकी कढी पिणे कधीही चांगलेच, लगेच जाणून घ्या रेसिपी

साहित्य

250 ग्रॅम पनीर (मध्यम आकाराचे तुकडे करून)

6 ते 7 लाल मिरच्या (2 तास गरम पाण्यात भिजवलेल्या)

तेल

1 टीस्पून जीरे

6 ते 8 लसुण पाकळ्या

2 चमचे लिंबु रस

1 टीस्पून लाल तिखट (काश्मिरी)

1 टीस्पून जिरा पावडर

1 टीस्पून आमचुर पावडर

1 टीस्पून गरम मसाला

1/2 टीस्पून हळद

1 टीस्पून तिळ

2 टीस्पून काळे मीठ

1 टीस्पून आले लसुण पेस्ट

1 टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट

1/2 कप कॉर्नफ्लोअर

1/4 कप मैदा

2 टीस्पून चणा डाळीचे पिठ

मीठ

how make Paneer koliwada recipe
Ashadhi Ekadashi recipes: ही कचोरी खाऊन उपवास मोडणार नाही, कारण, ही आहे फराळी कचोरी, पटकन लिहा रेसिपी

कृती

सर्वात आधी आपण कोळीवाड्याची चटणी बनवून घेऊ, त्यासाठी भिजवलेल्या लाल मिरच्या, लसुण पाकळ्या, जीरे आणि 1 टीस्पून काळे मीठ एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यावर लिंबु रस घालावा आणि चवीनुसार मीठ घालून याची एकदम मऊ अशी पेस्ट करून घ्या.

आता एका बाउलमध्ये अथवा भांड्यामध्ये 1 चमचा तेल घ्यावे आणि त्यात लाल तिखट घालून ते फेटून मिक्स करावे.यानंतर जिरा पावडर, आमचुर पावडर, गरम मसाला, हळद, तिळ, 1 चमचा काळे मीठ, आले लसुण पेस्ट आणि हिरव्या मिरचीची पेस्ट मिक्स करून घ्यावी. नंतर त्यात कॉर्नफ्लोअर, मैदा आणि डाळीचे पिठ घालून मिक्स करावे. गरजेनुसार पाणी घालून याचे दाटसर मिश्रण(भजीच्या पिठाप्रमाणे) बनवावे, वर चवीनुसार मीठ घालून ढवळावे.

how make Paneer koliwada recipe
Broccoli Spinach Cheela Recipe : नाश्त्यात बनवा पालक- ब्रोकोली चीला! मुलेही होतील खूश..

ही सर्व तयारी झाल्यानंतर गॅसवर कढई ठेवावी. त्यामध्ये तळणीसाठी तेल पुरेल इतक घाला आणि चांगल गरम करा. , तेल गरम झाले की तयार मिश्रणात पनीरचे केलेले तुकडे घोळवून मध्यम आचेवर खरपुस तळून घ्यावे. तळून झाले की आधी तयार केलेल्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.