तुमचा सकाळचा नाश्ता कसा असावा? कोणते पदार्थ खावेत? वाचा

 How to plan your breakfast know some options Marathi Article
How to plan your breakfast know some options Marathi Article
Updated on

नाशिक : दिवसाचा पहिला आहार हा पौष्टिक आणि उर्जा देणारा असणे चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. चांगला ब्रेकफास्ट आपल्या शरिरासोबतच आपला मेंदूही तंदुरुस्त ठेवतो. ब्रेकफास्ट चांगला असेल तर तो लठ्ठपणा कमी करणे, रक्तदाब आणि साखर पातळीवर नियंत्रण आणि हृदयाशी संबंधित आजारांची शक्यता कमी करण्यास मदत करतो.

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात तुमचा सकाळचा नाश्ता कधीही विसरु नका. त्यासाठी आपण त्याचे प्लॅनिंग आधीपासूनच करावे, जेणेकरून आपण कोणत्याही परिस्थितीत नाश्ता चुकणार नाही. तुम्ही आप आपल्या निवडीनुसार फळे, हिरव्या भाज्या, नट्स, ओट्स, पोहा, उपमा, कॉर्न फ्लेक्स, अंडी इत्यादी विविध पर्यायांमधून नाश्त्याचे पर्याय निवडू शकता. हे पदार्थच तुम्हाल दिवसभर काम करण्यासाठी उर्जा देतील. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस बसून संपूर्ण आठवड्यात ब्रेकफास्टचे मेनू ठरवा. बाजारपेठेतून आवश्यक वस्तू घेऊन या. जर आपल्याला ऑफिसला  उशीर झाला असेल तर ब्रेकफास्ट टिफिन भरुन सोबत घेऊन जा आणि प्रवासादरम्यान तो खा. रात्रीच सकाळच्या न्याहारीसाठी काही तयारी करुन ठेवा.  न्यूट्रिशनिस्टांच्या मते दिवसाच्या पहिल्या आहारात कार्ब्स आणि प्रोटीन्स असावेत.

इडली सांबार आणि चटणी  

इडली त्यासोबत भाज्या घालून केलेलं सांबार आणि चटणी हा दिवसाच्या सुरुवातीचा ब्रेकफास्ट तुम्हाला आवश्यक असतात ते सर्व घटक पुरवतो.  सांबारमध्येही डाळी प्रथिने रे मसाले आपल्याला बरीच जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. चटणीमध्ये नारळ असते, ज्यामुळे आपल्याला आवश्यक फॅट मिळतात. हा ब्रेकफास्ट परिपुर्ण आहे. 

पनीर मटार पराठा आणि दही

गहू पराठे आपल्याला दिवसाची 60% कार्ब्स देतात. चीज, मटार पासून प्रथिने. तूपातील फॅट आणि जीवनसत्त्वे आपल्या शरीराला पोषण देतात. या सकाळ-सकाळच्या न्याहारीमुळे तुम्हाला बर्‍याच वेळ भूक लागणार नाही. 

पालक, कोंबडीची अंडी आणि ब्राऊन ब्रेड टोस्ट

आपल्याकडे वेळ नसेल तर न्याहारीसाठी आपण अंडी, काही हिरव्या भाज्या आणि ब्राऊन ब्रेड देखील घेऊ शकता. तुम्हाला टोस्टमधून कार्ब्स मिळतात, तर अंडी प्रोटीन देतात. टोस्टवर पसरलेले पिनट बटर आपल्याला प्रथिने आणि आवश्यक फॅट्स देतात. पालकमध्ये खनिज आणि जीवनसत्त्वे असतात. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.