Summer Recipe : साबुदाण्याचे पापड बिघडतायत? मग ही पद्धत नक्की ट्राय करा...

वाळवण करण्याची सध्या सगळ्यांचीच लगबग सुरू असेल. त्यासाठीच जाणून घ्या एक सोपी रेसिपी.
Saudana Papad
Saudana PapadSakal
Updated on

उन्हाळा म्हणजे वाळवणाचे, लोणची-पापडांचे दिवस. या दिवसांत गृहिणींची गडबड सुरू असते. वाळवण कऱण्यासाठी कौशल्य असणंही गरजेचं असतं. नाहीतर ते बिघडण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला साबुदाण्याचे पापड कसे करायचे हे जाणून घेणार आहोत. तुमचे पापड बिघडत असतील तर ही पद्धत नक्की ट्राय करून पाहा आणि परिवारासह चविष्ट साबुदाणा पापडांचा आनंद घ्या.

साहित्य -

  • अर्धा कप साबुदाणा

  • बारीक कापलेली हिरवी मिरची

  • चवीनुसार मीठ

  • एक टीस्पून जीरे

  • तळण्यासाठी तेल

Saudana Papad
Kulfi Recipe : कुल्फी हेल्दी असू शकते का? हो, पण जर 'या' पद्धतीने बनवली असेल तर...

कृती-

  • साबुदाणा स्वच्छ धुवून घ्या.

  • त्यानंतर एका तासासाठी पुरेश्या पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर अनावश्यक पाणी काढून टाका आणि रात्रभर भिजवून ठेवा.

  • सकाळी या भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ आणि जिरे टाका आणि एकत्र करा.

  • त्यानंतर इडली पात्र घ्या.

  • त्यातल्या साच्याला व्यवस्थित तेल लावून घ्या.

  • त्यानंतर एक पातळ थर त्यावर लावा.

  • इडली पात्रात दीड वाटी पाणी टाका, त्यामध्ये इडलीचं स्टँड ठेवा.

  • दहा मिनिटं मध्यम आचेवर हे शिजवून घ्या.

  • त्यानंतर थोडं गार झाल्यानंतर पापडी पात्रामधून बाहेर काढा.

  • त्यानंतर दोन ते दिवस उन्हामध्ये वाळवा.

  • काही वेळानंतर हे पापड उलटत राहा.

  • इडली पात्राऐवजी तुम्ही पारंपरिक पद्धतीने थेट प्लास्टिकच्या कागदावरही पापड घालू शकता.

  • पापड थेट उन्हामध्ये वाळवावेत.

  • वाळल्यानंतर हे पापड तुम्ही तळून खाऊ शकता.

  • पण पापडातील पूर्ण पाणी निघून जायला हवं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.