Bajra Idli Recipe: नाश्त्यात चविष्ट आणि हेल्दी खायचे आहे? मग बनवा बाजरीची इडली, पाहा रेसिपी!

Tasty And Healthy Breakfast: बाजरी आरोग्यासाठी फायदेशीर असण्यासोबतच शरीराला आतून उबदार ठेवण्यासही मदत करते. तुम्ही बाजरीची भाकर खाल्ली असेल, पण तुम्ही कधी बाजरीची इडली बनवून खाल्ली आहे का?
Bajra Idli
Bajra Idlisakal
Updated on

पावसाळ्यात आपण आहारात आरोग्यदायी गोष्टींचाही समावेश करतो. ज्यामुळे आपण निरोगी राहू शकतो. आपण आहारात पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश करण्यासाठी विविध प्रकारच्या रेसिपीज देखील ट्राय करतो. तुम्ही तुमच्या आहारात बाजरीचा समावेश करा.

बाजरी आरोग्यासाठी फायदेशीर असण्यासोबतच शरीराला आतून उबदार ठेवण्यासही मदत करते. तुम्ही बाजरीची भाकर खाल्ली असेल, पण तुम्ही कधी बाजरीची इडली बनवून खाल्ली आहे का? तुम्ही बाजरीची इडली बनवून नाश्त्यात खाऊ शकता. हेल्दी ब्रेकफास्टसाठी हा अगदी बेस्ट पर्याय आहे.

बाजरीच्या इडलीसाठी लागणारे साहित्य

  • बाजरी - 2 कप

  • ताक - 2 कप

  • इनो- 1 चिमूटभर

  • काळी मिरी पावडर - 1 टीस्पून

  • मीठ - चवीनुसार

Bajra Idli
Jowar Appe Recipe : ज्वारीच्या पिठापासून झटपट बनवा चवदार अप्पे, एकदम सोपी आहे रेसिपी

बाजरीची इडली कशी बनवायची

सर्वात आधी बाजरी घ्या आणि ती पूर्णपणे स्वच्छ करा. यानंतर बाजरी एका भांड्यात ठेवा. त्यामध्ये 1-2 कप ताक घाला आणि किमान 2 तास भिजत ठेवा. ठरलेल्या वेळेनंतर काळी मिरी आणि चवीनुसार मीठ घालून सर्वकाही चांगले मिसळा. आता यामध्ये थोडे इनो घालून चांगले फेटून घ्या.

त्यानंतर, इडली बनवण्याचे भांडे घ्या. त्याला तेल लावून घ्या आणि त्यात बाजरी इडलीचे बॅटर घाला. आता इडलीचे भांडे गॅसवर 15-20 मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर, इडली शिजली की नाही ते चेक करा. इडली शिजल्यानंतर गॅस बंद करून चटणीसोबत गरमागरम, पौष्टिक इडली सर्व्ह करा.

Crossword Mini:

Related Stories

No stories found.