Christmas 2023 : यंदा ख्रिसमसला घरच्या घरी बनवा लहान मुलांच्या आवडीचा ब्लॅक फॉरेस्ट केक, एकदम सोपी आहे रेसिपी

लहान मुलांच्या आवडीचा ब्लॅक फॉरेस्ट केक कसा बनवायचा? ते जाणून घेऊयात.
Christmas 2023
Christmas 2023esakal
Updated on

Christmas 2023 : सध्या सर्वत्र ख्रिसमसची लगबग पहायला मिळत आहे. बाजारात ख्रिसमसच्या डेकोरेशनच्या वस्तूंची आणि विविध खाद्यपदार्थांची नुसती रेलचेल पहायला मिळत आहे. त्यामुळे, या वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.

ख्रिसमसनिमित्त अनेकांच्या घरी विविध प्रकारचे केक्स बनवले जातात. केक म्हटलं की तो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. यंदाच्या ख्रिसमसला जर तुम्ही लहान मुलांच्या आवडीचा ब्लॅक फॉरेस्ट केक बनवण्याचा विचार करत असाल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. आज आम्ही तुम्हाला हा ब्लॅक फ़ॉरेस्ट केक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

Christmas 2023
Christmas 2023 : ख्रिसमस पार्टीसाठी घरच्या घरी बनवा चॉकलेट स्पंज केक, एकदम सोपी आहे रेसिपी

ब्लॅक फॉरेस्ट केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • अर्धा कोको पावडर

  • १ कप मैदा

  • बेकिंग पावडर – दीड चमचा

  • अर्धी वाटी दही

  • अर्धा कप पाणी

  • पाऊण कप पीठीसाखर

  • १ चमचा व्हॅनिला इसेंन्स

  • बटर अर्धी वाटी

  • चवीनुसार मीठ

  • चॉकलेटचे तुकडे

ब्लॅक फॉरेस्ट केक बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • ब्लॅक फॉरेस्ट केक बनवण्यासाठी सर्वात आधी एक मोठे भांडे किंवा मोठे बाऊल घ्या.

  • या बाऊलमध्ये मैदा, कोको पावडर आणि बेकिंग पावडर चाळणीच्या मदतीने चाळून घ्या.

  • त्यानंतर, यामध्ये बटर, पीठीसाखर, मीठ, व्हॅनिला इसेन्स आणि पाणी घालून चांगले फेटून घ्या. या मिश्रणात गुठळ्या राहता कामा नये, याची काळजी घ्या.

  • आता या मिश्रणात अंडी फेटून घ्या आणि मिश्रण पुन्हा चांगले एकजीव करून घ्या.

  • आता केकचे भांडे घ्या, त्याला बटर किंवा तूप लावून घ्या.

  • त्यानंतर, या भांड्यात केकचे मिश्रण घाला.

  • त्यानंतर, कुकर गॅसवर गरम करायला ठेवा.

  • ५ मिनिटे कूकर गॅसवर गरम झाल्यानंतर त्यात केकचे भांडे ठेवा.

  • आता कूकर ३० मिनिटे बारीक गॅसवर ठेवा.

  • अर्ध्या तासापर्यंत कुकरला केक चांगला शिजेल.

  • त्यानंतर, कूकर बंद करून केक शिजला आहे का? हे चेक करा आणि केक थंड व्हायला ठेवा.

  • तुमचा ब्लॅक फॉरेस्ट केक आता तयार आहे.

  • या केकवर तुम्ही व्हिप क्रिमच्या सहाय्याने, टूट फ्रूटी किंवा ड्रायफ्रूट्सने सजावट करू शकता आणि केकचा आस्वाद घेऊ शकता.

Christmas 2023
Christmas 2023 : यंदा ख्रिसमसला घरच्या घरी बनवा रेड वेलवेट केक, एकदम सोपी आहे रेसिपी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.